या लोकसभा निवडणूकीत आमचा प्रयत्न होता की, भाजपाच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजपा विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. मुंबई दादर येथील डॉ …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग…
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा …
Read More »अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर भाजपाचे शिक्कामोर्तब
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या आधी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात दोन गट पडले. त्यातच खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. तर स्थानिकस्तरावर शिवसेना नेते आनंदराव आडसूळ …
Read More »नाना पटोले यांचे आवाहन, …लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज
लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, …
Read More »आशिष शेलार यांची टीका,… ही यादी म्हणजे उबाठाच्या पराभवाची पहिली पायरी
एक खिचडीतील भ्रष्टाचारी, एक जुना राष्ट्रवादी यांनी घेतला कडेवरी आणि एक बांडगूळा सारखा आमच्या मतांचा त्यावेळचे वाटेकरी …. उबाठाची आजची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी अशी खोचक टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, उबाठा गटाची आज यादी जाहीर झाली त्यामध्ये …
Read More »काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू झाला आहे. कंगना रणौतने काँग्रेस नेत्याला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की लोकांनी “लैंगिक कार्यकर्त्यांचे आव्हानात्मक जीवन किंवा परिस्थिती एखाद्या प्रकारचे गैरवर्तन किंवा अपमान म्हणून वापरणे टाळावे” असा खोचक टोला लगावला. हिमाचल प्रदेशच्या मंडीतून कंगना राणौतला …
Read More »कर्नाटकातील खाणसम्राट जर्नादन रेड्डी यांची भाजपात वापसी
कर्नाटकातील बेल्लारीतील प्रसिध्द खाण व्यवसायिक आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक आमदार जी. जनार्दन रेड्डी यांनी आज रविवारी २५ मार्च रोजी धुलनिवंदनचे औचित्य साधात त्यांचा कल्याण राज्य प्रगती पक्ष भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये विलीन केला आणि त्यांची पत्नी अरुणा लक्ष्मी आणि इतर अनुयायांसह भाजपामध्ये औपचारिकपणे पुन्हा प्रवेश केला. लोकसभा …
Read More »भाजपाच्या ५व्या यादीत महाराष्ट्रातील तीन जणासह १११ जणांची उमेदवारी जाहिर
भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली असून या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. सोलापूरातून अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे इतर नवख्या उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. तर भंडारा-गोंदियातून सुनिल बाबूराव मेंढे यांना तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी …
Read More »उद्योगपती आणि काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांचा भाजपात प्रवेश
उद्योगपती आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. जिंदाल स्टील अँड पॉवरच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर आपल्या ट्विटद्वारे काँग्रेस नेतृत्व आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आभार मानले आहेत. प्रसिध्द उद्योगपती आणि कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल यानी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत …
Read More »भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे असा उपरोधिक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. पुढे बोलताना भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »
Marathi e-Batmya