Tag Archives: bjp

देवेंद्र फडणवीसांची घोषणा, विदर्भ- मराठवाड्यातील उद्योगांसाठी नवे ऊर्जा धोरण विरोधकांच्या प्रस्तावावर फडणवीसांचे उत्तर

विरोधकांनी विधानसभेत २९३ अन्वये मराठवाडा-विदर्भातील अनुशेष भरतीच्या अनुशंगाने काल दुपारपासून चर्चा करण्यात येत होती. त्या प्रस्तावाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विदर्भ आणि मराटवाड्यातील उद्योगांसाठी विशेष ऊर्जा धोरण करण्यात येत असल्याची घोषणा केली. विदर्भ मराठवाडा भागातील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दादा आमच्यात भांडणे लावू नका, माझे नीट लक्ष आहे अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रत्युत्तर

विरोधकांनी विधानसभेत विदर्भ-मराठवाडाच्या विकासासाठी मांडलेल्या २९३ च्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर राईट टू रिप्लाय अंतर्गत प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांच्या चिमट्याला …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, गायरान जमीनप्रकरणात सत्तारांनी एजंटामार्फत पैसे घेतले चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या

तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली. तसेच मंत्री सत्तार यांनी गायरान जमिन …

Read More »

गिरिष महाजन म्हणाले, खरं तर बोगस डॉक्टरांना आपणच अलाऊन्स देतोय फक्त त्यांना दररोज पाचशेचा दंड ठोठावतो, कायदा बदल्याची आवश्यकता

मागील काही वर्षांमध्ये राज्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भातील प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बन्सोड यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरिष महाजन म्हणाले, खरे तर आपण बोगस डॉक्टरांना आपणच अलॉऊन्स देतोय असे सांगत या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या एका निर्णयामुळे असल्याचे स्पष्टीकरण दिले. विधानसभेचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्स विधानसभेत केली आमदारांच्या मागणीवर जाहिर केला निर्णय

अंमली पदार्थाची तस्करी रोखणे आणि युवा पिढीला यापासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स तयार केला आहे. त्याबरोबरच अंमली पदार्थ विरोधी विभागाचं विकेंद्रीकरण करून त्याचे बळकटीकरण करण्याचा विचार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर …

Read More »

भाजपा म्हणते, आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही अजित पवार यांच्या आव्हानाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

बारामतीच्या आपल्या एकाच दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना इतकी भिती वाटली की, ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत. पण आपला करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही. त्यांनी नागपुरात येऊन अशी भाषा करू नये. आपण त्यांचे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत, अशा शब्दात भारतीय जनता …

Read More »

विरोधकांनी सभात्याग केल्याचा फायदा उचलत नवा लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले सभागृहाचे आभार

विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यावर प्रश्नोत्तराचा तास आणि त्यानंतर लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरु होती. लक्षवेधीवरील टीईटी परिक्षेतील घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडीने सभात्याग केला. विरोधक बाहेर पडल्याचे दिसताच विधानसभा अध्यक्षांनी लोकायुक्त विधेयक मंजूरीसाठी आवाज दिला. विशेष म्हणजे सभागृहातील प्रथा पंरपरेनुसार विधेयक …

Read More »

अजित पवार म्हणाले, ताकीद द्या… कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत

कर्नाटकचे विधी मंत्री मधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी त्यांच्या विधानसभेत केली आणि मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहतात असा जावईशोधही लावला आहे. कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई तर कर्नाटकचीच आहे असा दावा करुन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात कन्नड नाहीत का? असा …

Read More »

अजित पवारांनी सभागृहातच दिला भाजपा आमदारांना इशारा, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार भरतशेठ गोगावले कधी घालणार कोट पॅट

विधानसभेत आज २९३ वरील प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा नेत्यांच्या अनेक वक्तव्यावरून पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच इशारा दिला. तर शिंदे गटातील आमदारांच्या टोप्याही उठवित रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात सर्व आमदारांना आवाहन केले. विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, मध्यंतरी काही जण बारामतीत आले होते. अलीकडे सप्टेंबर …

Read More »

रूग्णालयातून बाळासाहेब थोरात यांनी मांडली अब्दुल सत्तारप्रकरणी सत्यता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले आरोप खोटे व दिशाभूल करणारे

राज्याचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भूखंड वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत दोषी ठरविले. त्यावरून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासागहेब थोरात यांच्यावर आरोप केले. सध्या दुखापतीमुळे मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयातून विखे-पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर …

Read More »