Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दादा आमच्यात भांडणे लावू नका, माझे नीट लक्ष आहे अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रत्युत्तर

विरोधकांनी विधानसभेत विदर्भ-मराठवाडाच्या विकासासाठी मांडलेल्या २९३ च्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर राईट टू रिप्लाय अंतर्गत प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांच्या चिमट्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले.

यावेळी अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना भाजपाचे सर्व सदस्य बाके वाजवून स्वागत करत होते. मात्र जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु होते. त्यावेळी भाजपाचे सदस्य बाके वाजवित नव्हते. यावरून भाजपा आमदार सिलेक्टीव्ह झाल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर फडणवीस असून घोषणा करताना ठासून सांगतात की, आम्ही दिल्लीला प्रस्ताव पाठविला, त्या प्रकल्पासाठी इतक्या कोटी रूपयांची तरतूद केली. असे ठामपणे सांगतात. मात्र राज्याच्या प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र एखादी घोषणा करायची असली तरी ही गोष्ट करणार आहे, याविषयीचा प्रस्ताव मागविला आहे सारखी मागे सरकणारी वक्तव्य करतात.
अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात. त्यामुळे तुम्ही पुढे होऊन घोषणा केली पाहिजे.

त्यावर मध्येच मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, या गोष्टी आम्हाला माहित आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, माहित आहे तर मग मुख्यमंत्र्यांना का सांगत नाही असा सवाल करत त्यांना सांगा कसं असते अशी सूचना केली. तसेच फडणवीसजी हात चोळल्यासारखं करत मला बघु नका मला चांगलं समजतं असे सांगत टोपीही उडविली.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांच्या टीपण्णीला प्रत्युत्तर देताना म्हणाले, अजित दादा तुम्ही आमच्यात भांडणे लावू नका, माझे नीट लक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाताकडे लक्ष होते. मी घोषणा करत असताना ते ही बाके वाजवित होते. तसेच भाजपाचे आमदारही वाजवित होते असे सांगत अजित पवारांचा आरोप फेटाळून लावला.

त्यावर देवेंद्र फडणवीस ही म्हणाले, आमच्यात तर फक्त दोन पक्ष आहेत. मात्र तुमच्या आघाडीत तर तीन पक्ष होते. त्यामुळे ज्या पक्षाच्या मंत्र्याचे उत्तर असायचे त्या पक्षाच्या मंत्र्याला आपल्या आमदारांना सभागृहात बसवावे लागायचे. तसेच त्याच्याच पक्षाचे आमदार टाळ्या वाजवायचे. त्यामुळे तुम्हालाही सिलेक्टीव्ह बघायची सवय लागली अशी कोपरखळी अजित पवारांना लगावत आमचे सगळे आमदार टाळ्या वाजवितात असे प्रत्युत्तर दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत