Tag Archives: bjp

भाजपामधील एकाधिकारशाहीच्या विरोधात आमदार डॉ. देशमुखांचा राजीनामा पक्षांतर्गत असलेली धुसफूसीमुळे अनेकजण बाहेर पडण्याच्या तयारीत

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत आपले राजकिय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक आयाराम रांगेत आहेत. मात्र भाजपमधील पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमधून बाहेर पडणाऱ्यांची सुरुवात झाली असून भाजपचे नागपूर जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी आपल्या आमदाराकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पत्राद्वारे आज दिला. लवकरच …

Read More »

भाजपा विरोधात मुद्दा नसल्याने विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला देशात व महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. …

Read More »

अखेर त्या वक्तव्याप्रकरणी आमदार राम कदमांची बिनशर्त माफी महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची राज्य महिला आयोगाला हमी

मुंबईः प्रतिनिधी वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार राम कदम यांनी आपला खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेकेला असून त्यानुसार त्यांनी आयोगापुढे बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही दिली आहे. आमदार कदम यांच्या या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या …

Read More »

फुंडकरांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला मतदान भाजपामध्ये तिकिटासाठी चढाओढ

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या तीन ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत याची घोषणा केली. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. २४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांचे सदस्यत्व होते. परंतु …

Read More »

राम कदम यांची भाजपमधून गच्छंती ? अभाविप संघटनेकडूनही कदमांविरोधात जुते मारो आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महिलांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात समाजाच्या सर्वचस्तरातून आणि प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठली. त्याचे राजकिय पडसादही मोठ्या प्रमाणावर उमटण्यास सुरुवात झाल्याने अखेर भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आता कदम यांच्या विरोधात जुते आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पक्षातून गच्छंती अटळ …

Read More »

भाजपबरोबरच्या सत्तेतून बाहेर पडणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षापासून राज्याच्या सत्तेत विराजमान असूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये सातत्याने कलगीतुरा सुरुच आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या अटकळी सातत्याने बांधण्यात येत होत्या.मात्र भाजपबरोबरील सत्तेतून आम्ही बाहेर पडणार नाही, पण सत्तेत राहून राज्यातील जनतेच्या हिताची कामे करू अशी स्पष्टोक्ती दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …

Read More »

भुजबळांना शिवीगाळ, माज आलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अजित पवार यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेची विधानसभेत मागणीः कामकाज तहकूब

नागपूरः प्रतिनिधी नुकतेच जामिन सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपरोक्ष श्रीगोंदा येथील पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीने शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना माज आलाय का? कशामुळे शिवीगाळ करतोय असा सवाल करत माज आलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून विरोधकांचे रणकंदन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब: राजदंड पळविला

नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करून त्याऐवजी त्यांच्या तलवारीची उंची वाढविण्याची योजना राज्य सरकारची असल्याची सत्य माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. त्यामुळे पुतळ्याची उंची कमी करण्याचा कोणताही अधिकार राज्य सरकारला नसल्याचा टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत याप्रकरणी सरकारने …

Read More »

अध्यक्ष बागडेंच्या निर्णयामुळे सरकारची नाचक्की तर विरोधकांचा विजय विरोधकांच्या मागणीनुसार उर्वरित उत्तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर

मुंबई : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मांडलेल्या २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र विशेष बैठकीची वेळ संपत आल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्री देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वेळ वाढविण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवित विरोधकांच्या मागणीनुसार निर्णय घेत …

Read More »

शुभ बोल रे “ डॉ.आशिष ” सरकारचे आमदार डॉ. देशमुखांना साकडे

नागपूर : प्रतिनिधी स्वंतत्र विदर्भाच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करणाऱे भाजपचे विदर्भातील आमदार डॉ. आशिष देशमुख यांना सरकारकडून विरोधकांच्या प्रस्तावावर बोलण्यास सांगितले. मात्र सरकारच्या विरोधात बोलण्याऐवजी बाजूने बोलण्यास सांगितल्याची माहिती विधानसभेत भाजप आमदार डॉ.आशिष देशमुख यांनीच सांगितल्याने भाजपला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा विधानसभेत सुरु …

Read More »