तिहार जेलच्या इशाऱ्याने विरोधक सध्या सैरभर झाले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार जेलची भीत वाटत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या घायळ झाली आहे. त्यामुळे त्यांनो नेमकं काय बोलाव हे कळतं नाही, म्हणून निवडणूकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस सैरभर झाल्याची टिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केली.
आपण सगळया विरोधी पक्षांना एकत्र आणले म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यावर टिका करत असल्याचे विधान शरद पवार यांनी केले. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, शरद पवार यांनी कोणते विरोधक एकत्र आणले ? मायावती, अखिलेश यादव एकत्र आले का… ममता बॅनर्जी, प्रकाश आंबेडकर एकत्र आले का… पवारांचे हे वक्तव्य म्हणजे पवार कुटूंब एकत्र आहेत, असे म्हणण्यासारखे आहे. रोहित पवार एक करतात, अजित पवार दुसरंच बोलतात, सुप्रिया सुळे यांचेही काही वेगळचं चाललयं, पार्थ पवार सुध्दा निराळच बोलतात हे जसे एकत्र आहे तसे विरोधी पक्षांचे महागठबंधन एकत्र आले असावे, असे पवार यांना वाटत असावे, असा टोलाही लगावला.
निवडणूकीनंतर चौकीदारांना जेलमध्ये टाकणार या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, स्वत: राहूल गांधी जामीनावर आहेत त्यांचे मेहुणे जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांचा एक पाय आधीच जेलमध्ये आहे ते दुसऱ्यांना जेलमध्ये कसे पाठवणार असा खोचक सवालही त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूकीत किती जागांवर निवडणूक लढवीत आहेत हे त्यांनी आधी तपासून पहावे. केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जितक्या जागा लागतात. तितक्या जागा ते लढवीत सुध्दा नाहीत. मग, सरकार आल्यानंतर आम्ही असे करु अशा फुशारक्या आंबेडकर कशासाठी मारत आहेत अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
मोदींच्या आक्रमक प्रचारापुढे सगळेच विरोधी पक्ष आता सैरभर झाले आहेत. त्यामुळे प्रचारात काय बोलावे व काय बोलू नये हे त्यांना सूचत नाही. सध्या आपण जे बोलतोय ते लोकांना पटणारे आहे का व त्यात कितपत खरे आहे हेही त्यांना सध्या जाणवत नसल्याची टीका त्यांनी केली.
नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी राज ठाकरे राज्यात ८ ते ९ सभा घेणार असल्याबद्दल त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. तावडे म्हणाले की, राज ठाकरे सध्या बारामतीने लिहून दिलेली “स्क्रीप्ट” करीत आहेत. पण यामुळे नरेंद्र मोदी यांची मते कमी होणार नाहीत. पण, राज ठाकरे यांची विश्वासाहर्ता अजून कमी होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *