Tag Archives: cm fadnavis

एमपीएससी आणि वैद्यकीय प्रवेशात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय कॉंग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांचा सरकावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय परिक्षार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर राज्य सरकारकडून अन्याय करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले मार्क आणि मार्काच्या आधारे खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळत असला तरी या विद्यार्थ्यांपेक्षा खुल्या प्रवर्गातील कमी मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना …

Read More »

…आणि रंगला सत्ताधारी-विरोधकांच्या गप्पांचा फड मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, बापट, तावडे यांच्यासह अनेकांनी उडविल्या एकमेकांच्या टोप्या

मुंबई : प्रतिनिधी एरवी विधिमंडळात आणि जाहीर सभांमधून सत्ताधारी – विरोधकांकडून नेहमीच एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतात. मात्र कोणत्याही नैमित्तिक कारणाशिवाय सहज भेटणाऱ्या राजकिय व्यक्तींचा एका वेगळाच चर्चेचा फड रंगल्याचे चित्र क्वचित पाह्यला मिळते. नेमके असेच चित्र नुकतेच विधान भवनात पाह्यला मिळाले. काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा पूर्व आढावा …

Read More »

राज्याच्या महाधिवक्त्यांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयात राज्याची न्यायिक बाजू मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पहिल्यांदाच न्यायिक बाजू पाहणाऱ्या व्यक्तीला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त होणार असून यासंदर्भातील शासकिय आदेशही गुरूवारी पारीत करण्यात आला आहे. महाधिवक्त्यांना यापूर्वी …

Read More »

मुंबई महानगरपालिकेतील २७०० सफाई कर्मचाऱ्यांना सामावून घ्या तीन महिन्यात सामावून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २७०० सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांच्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमुळे सेवेत सामावून घेण्यास अडचणी येत आहेत, त्या कामगारांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेऊन त्यांना येत्या तीन महिन्यात सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २७०० सफाई कामगारांना सेवेत घेण्यासाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर राज्यात गुंतवणूक करणार महाराष्ट्र-क्युबेकमध्ये आर्थिक सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्यूबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी आज स्वाक्षरी केली. यासोबतच निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या …

Read More »

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार

मुंबई : प्रतिनिधी कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्यूबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने आज महत्त्वपूर्ण यश मिळवले. आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटी संस्थांचे सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून राज्यात आर्टिफिशियल …

Read More »

मागण्या मान्य करा अन्यथा सरकारविरोधात असहकार शेतकऱ्यांनंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने द्यावा यासह विविध मागण्यांच्या प्रश्नी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने मंत्रालयासमोर आज दुपारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मंत्रालयातील सरकारी कर्मचारी सहभागी झाले …

Read More »

मागासवर्गीयांच्या भरतीच्या चौकशीच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न मुख्य प्रवेशद्वारासमोर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी धुळे शहर महानगरपालिकेत १९८९ साली मागासर्गीयांची भरतीची सीआयडी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील रहिवासी बबन यशवंत झोटे या व्यक्तीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हालचाल करून झोटे यास आत्महत्येपासून परावृत्त केले. महानगरपालिकेत सरळसेवा भरतीच्या माध्यमातून मागासवर्गीयांची झालेल्या …

Read More »

धारावीसह इतर पायाभूत प्रकल्पांना आता थेट दुबईतून मदत मिळणार दुबईतील एमबीएम समुहाच्या प्रमुखाशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

 दुबई-  मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील धारावी पुर्नवसन प्रकल्पासह अनेक मोठ्या प्रकल्पांना भारतीय अर्थात मुंबईतील गुंतवणूकदारांकडून आणि सरकारी बँकांकडून गुंतवणूकीस अप्रत्यक्ष नकार दिला. त्यामुळे या अर्धवट तर काही प्रकल्प सुरुच होवू शकले नसलेल्या प्रकल्पांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेशी दौऱ्यावर असून या प्रकल्पांसाठी दुबईतील प्रसिद्ध एमबीएम …

Read More »

संभाजी भिडेला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांचा सरकारकडूनच बनाव ? गृह विभागाला सांगून खोटा अहवाल बनविल्याची दबक्या आवाजात मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगांव येथे दलितांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात नक्षलवादी गुंतल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. मात्र या हिंसाचाराच्या मागील असलेला प्रमुख संशयित आरोपी संभाजी भिडेला अटक करण्याऐवजी त्याना वाचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाला सांगून नक्षलवाद्यांकडून …

Read More »