Tag Archives: congress

बिहार विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात ६४.४६ टक्के मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले

गुरुवारी (६ नोव्हेंबर २०२५) बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान संपले तेव्हा तात्पुरते ६४.४६% मतदान झाले, असे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) विनोद सिंग गुंजियाल यांनी सांगितले. दोन्ही आघाडीतील लहान पक्षांसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. सीपीआय (एमएल) ज्या २० जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी दहा जागा या टप्प्यात येतात, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची हकालपट्टी करा हजारो कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत पवारांच्या घशात घालण्यासाठी मदत करणा-या अधिका-यांना तात्काळ निलंबित करा.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून शून्य कारवाई, निवडणूक आयोग झोपेचे सोंग घेत आहे.

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे एक एक पुरावे देऊन निवडणूक आयोगाला नागडे केले पण निर्लज्जम …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या सहभागाने निवडणूक आयोगाची मतचोरी हरियाणात विधानसभा निवडणूकीत लोकशाही संपविण्यासाठीच केली मतचोरी

निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी भागीदारी करत लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न हरियाणा विधानसभा निवडणुकीत मत चोरी करून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हरियाणामध्ये “ऑपरेशन सरकार चोरी” सुरू करण्यात आले. सर्व एक्झिट पोल …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’ सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे काम, आता जनताच धडा शिकवेल

मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भारतीय जनता पक्षाला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित नाईक निंबाळकरला तात्काळ अटक करा

राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केल आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा पीएपीPAP घोटाळा मालाड पूर्वला ८.७१ लाख चौरस फुटाचा ५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा

भाजपा महायुती सरकारने मुंबईत एक नवीन बिझनेस मॉडेल उदयास आणले असून यातून ‘लाडक्या बिल्डरांचा फायदा करुन दिला जात आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा PAP घोटाळा करण्यात आला आहे. मालाड पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या डोंगराळ भागात ८.७१ लाख चौरस फुटाच्या भूखंडाचा महाघोटाळा केला असून हा मालाड पीएपी PAP घोटाळा तब्बल …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, पंतप्रधान मोदी अदानी अंबानीसाठी नाचतीलही पण निवडणूका झाल्यानंतर मात्र ते परत येणार नाहीत

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि ते मतांसाठी “नाटक” करत असल्याचा आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आरोप केला. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी लोकांचे ऐकत नाहीत आणि निवडणुकीनंतर “गायब” होतात. राहुल …

Read More »

बिहारच्या निवडणूकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तान आणि काँग्रेसवर केली टीका ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नाही

काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होत असताना पक्षाच्या ‘राजघराण्या’ची झोप उडाली असून, पाकिस्तान आणि काँग्रेसचे दोन्ही नामदार अद्याप ऑपरेशन सिंदूरमधून सावरलेले नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, भारत दहशतवाद्यांना त्यांच्याच लपलेल्या ठिकाणी शोधून काढत आहे. अलिकडेच आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवले. आम्ही आमची …

Read More »

काँग्रेसचे जयराम रमेश यांची दिल्ली सरकारच्या निर्णयावर टीका, क्रुर विनोद दिल्ली सरकारच्या क्लाऊड सीडींग प्रयोगावरून टीका

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लाउड सीडिंग प्रयोगाबद्दल काँग्रेसने रविवारी (२ नोव्हेंबर २०२५) दिल्ली सरकारवर टीका केली आणि म्हटले की मर्यादित क्षेत्रात एक-दोन दिवसांसाठी थोडीशी सुधारणा करणे हा “क्रूर विनोद” असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस (संप्रेषण) जयराम रमेश म्हणाले की, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिल्ली सरकारने हिवाळ्यातील …

Read More »