Tag Archives: congress

नाना पटोले यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेतून सभात्याग

आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरुन महायुती सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी …

Read More »

बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमकः नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित विरोधकांची मागणी, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी

पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्ज यावरून सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तर दुसरीकडे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्याची पाळी आली. दरम्यान, विधानसभेचे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा, भाजपा सरकारने पुन्हा सक्तीचे उद्योग करू नये लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा ; महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका महागात पडेल...

राज्यातील महाराष्ट्रद्रोही मराठी विरोधी सरकारला अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याविरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मराठी माणूस एकवटल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान व ओळख मराठी आहे आणि मराठीच राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठीचा आवाज दाबता येत नाही आणि येणारही नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, आरएसएसचा अजेंडा राबविण्यासाठीची हिंदीबाबत जनमत चाचणी मुख्यमंत्र्यांचे ‘एकला चलो रे’ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हिंदी सक्तीची माहितीच नव्हती

हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे. सरकारने हिंदी सक्तीचा शासनआदेश काढून याबाबत जनमत काय आहे हे तपासून पाहिले. महाराष्ट्र या विरोधात ठामपणे उभा राहिला म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर या माध्यमातून सरकारचा नाकर्तेपणा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र आरएसएसच्या संकल्पनेला काँग्रेसचा विरोध आणि हर्षवर्धन सपकाळांचे भाकित खरे ठरले

हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले …

Read More »

अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, हिंदी भाषेची सक्ती सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर, महाविकास आघाडी सरकारचा बहिष्कार

राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रती सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी ऐकवली आणीबाणी विरोधात वाजपेयी, देसाई यांची ऑडियो आणीबाणी भोगलेल्यांना देश कदापीही विसरणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ प्रसारणात तत्कालीन काँग्रेस सरकारवर लोकांवरील अत्याचारांबद्दल टीका करण्यासाठी आघाडीच्या आणीबाणीविरोधी राजकारण्यांच्या वक्तव्यांचा प्रसार केला आणि ते नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे कारण ते लोकांना संविधान मजबूत ठेवण्यासाठी सतर्क राहण्याची प्रेरणा देते. मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आणीबाणी लादणाऱ्यांनी केवळ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपाचा कुटील डाव हाणून पाडू, मराठीचा गळा घोटू देणार नाही गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. ८ व्या सुचीतील सर्वभाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपाचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू व मराठीचा गळा घोटू देणार नाही असा …

Read More »

जोजो थॉमस यांची मागणी, गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा आमदार गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन समाजाबद्दलचे द्वेषपूर्ण भाषण घटनेला आव्हान

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे धार्मिक तेढ निर्माण करमारे विधान केले असून त्यांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वे व कायद्याच्या राज्याला उघड आव्हान देणारे आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून एफआयआर FIR दाखल करा, अशी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग

भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र …

Read More »