Tag Archives: covid-19

मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांच्या अधिकारावर महसूल विभागाचे अतिक्रमण कोरोनाचे कारण पुढे करत महसूल विभागाकडून परस्पर दोघांची नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातल्या कोरोना संकटाच्या विरोधात लढण्यासाठी सगळे लढत असताना महसूल विभागाने मात्र थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विभागाच्या अधिकारावर अतिक्रमण करत थेट म्हाडाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा धक्कायदायक प्रकार नुकताच उघडकीस आला. काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या एका गोटे नामक अधिकाऱ्याने म्हाडाच्या कारभारात भलताच धुमाकुळ …

Read More »

सनदी अधिकारी राहुल पाटील यांनी होणाऱ्या पत्नीसोबत दिली कोरोना विरोधी लढ्याला मदत लग्न दिवसाची आठवण म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचे सहकार्य

चंद्रपूर: प्रतिनिधी आज २ मे खरं तर सध्या कोरोना नसता तर राहुल दादा आणि तेजस्विनी वहिनी यांचा लग्नं समारंभ झाला असता. राहुल पाटील हे भारतीय वनसेवेत (IFS) चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. अर्थात लग्न पुढे गेल्यामुळे खुप वाईट नक्कीच वाटतय. पण त्याहीपेक्षा या दोघांचं कौतुक जास्त वाटतय, त्याच कारणही तसंच आहे. …

Read More »

मुंबई महानगराची वाटचाल १० हजाराकडे: नव्याने ७९० सापडले मुंबई-ठाणे मिळून ९ हजार ७०९ वर संख्या पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १० हजारने ओलांडली असताना मुंबई आणि ठाणे मंडळ मिळून लवकरच ही संख्या ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात नव्याने ७९० रूग्ण आढळून आले असून राज्याची संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. तर मुंबई शहरातील बाधितांची संख्या ८ हजार ३५९ वर …

Read More »

सोलापूरात ११४ वर संख्या पोहोचली ३२ पैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह

सोलापूर: प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज ३२ जणाचे पाठविण्यात आलेले अहवालापैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी ३ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून आता रूग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे. नव्याने बाधीत असलेले रूग्ण आकाशवाणी रोडवरील गवळी वस्ती येथील एक जण …

Read More »

ग्रीन झोनमधल्या नांदेडमध्येही आता कोरोना जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात!: पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या अचानक २६ झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भयभीत न होता अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. गेल्या आठवड्यापर्यंत नांदेडमध्ये एकही रूग्ण नव्हता आणि आज ही संख्या २३ ने वाढून २६ वर गेली. नांदेडमधील जुन्या ३ रूग्णांपैकी १ …

Read More »

महसूल विभागाला झाली घाई, मंत्रालयाचे कामकाज बंद असताना काढले आदेश जानेवारीतल्या पदोन्नतीची पदस्थापना ३० एप्रिलला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या संकटाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बहुतांष मंत्री, शासकिय कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता दोन हात करत आहे. मात्र राज्याच्या महसूल विभागाला मात्र पदोन्नती दिलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पद स्थापना (पोस्टींग) देण्यासाठी मंत्रालयाचे कामकाज सुरू होण्याची वाटही बघाविशी वाटली नाही. उलट जंतूनाशक फवारणीसाठी मंत्रालय बंद ठेवण्याचे आदेश असतानाही …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच २४ तासात १००८ नवे रुग्ण एकूण संख्या ११ हजार ५०६ तर १८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात सर्वाधिक १००८ रूग्णांचे निदान झाले असून गेल्या ५१ दिवसात एकादिवसात इतक्या रूग्णांचे निदान होण्याची ही पहिलीच वेळ असून १०६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली पोहोचली असून ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू …

Read More »

आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन : परतणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी देशभरातील २ रा लॉकडाऊनचा टप्पा संपायला अवघे दोन दिवस शिल्लक राहीलेले असताना ४ ते १७ मे दरम्यानच्या तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तसेच स्थलांतरीत कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या इच्छित स्थळी अर्थात मुळ गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वे मंत्रालयाने गृह …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह महा आघाडीचे ५ आणि भाजपाचे ४ उमेदवार रिंगणात काँग्रेसमधून खान, सावंत, हुसेन तर भाजपातून तावडे, मुंडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राजकिय स्थिरता आणण्याच्या उद्देशाने विधान परिषदेची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विद्यमान उपसभापती अॅड.नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित सांगण्यात येत आहेत. तर काँग्रेसकडून दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पाच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. भाजपाकडून चार …

Read More »

राज्यातील सर्वांवर मोफत उपचार : खाजगी रूग्णालयांच्या मनमानीस लगाम महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट

मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर करत राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही …

Read More »