मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला यश : कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना गावी जाण्यास परवानगी मुंबईतील ६ लाखाहून अधिक कामगार घरी पोहोचणार
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात अडकलेल्या जवळपास १० लाख कामगारांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून पर्यटक, विद्यार्थी यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून तसे आदेशही जारी करण्यात आले. विशेष म्हणजे परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव …
Read More »खुशखबर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेवून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी …
Read More »कोटा येथे अडकलेले ३२ विद्यार्थी रायगडकडे रवाना पालकमंत्री आदिती ठाकरे यांची माहिती
अलिबाग: प्रतिनिधी राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आज २८ रोजी पहाटे कोटा …
Read More »९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …
Read More »सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी …
Read More »सरकारकडून देहविक्रयातील महिलांना ‘रेशन’, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा अॅड. यशोमती ठाकूर वेळोवेळी घेत आहेत आढावा
मुंबई: प्रतिनिधी देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत या महिलांच्या उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व …
Read More »कोविड विरोधी लढ्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, …
Read More »स्वत:ची गाडी आहे ? मूळ गावी, परराज्यात- परदेशात जायचं मग उद्याच भेटा तहसीलदाराकडून आदेश जारी
मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक स्वत:चा जिल्हा, गाव आणि राज्य सोडून इतररत्र आडकले आहेत. अशा नागरिकांना आता आपल्या मूळ गावी किंवा राज्यात परतण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. कुडाळमध्ये अशा अडकलेल्या व्यक्तींनी सरकारने दिलेल्या फॉर्मेटमघ्ये उद्या २८ एप्रिल रोजी संध्याकाळी प्रत्यक्ष कार्यालयात येवून अर्ज सादर करण्याचे आदेश …
Read More »रूग्ण सापडल्यानंतर मंत्रालय आणि प्रशासकिय इमारत दोन दिवसांसाठी बंद निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लागण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना होवू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला अखेर मंत्रालयातच या विषाणूची लागण झालेले रूग्ण सोमवारी सापडले. त्या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांनाही होवू नये यासाठी मंत्रालय, नवीन प्रशासकिय इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २९ आणि ३० एप्रिल या दोन …
Read More »
Marathi e-Batmya