भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन …
Read More »मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची शासकिय फाईलीवर सही पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्यात रोल बदलले असले तरी… आता महाराष्ट्र थांबणार नाही-पत्रकार संघातील वार्तालापावेळी देवेंद्र फडणवीस यांची माहिती
राज्याच्या मुख्यमंत्री पदी जरी यावेळी मी आलो असलो तरी यापूर्वी मी आणि अजित पवार हे दोघे म्हणून औटघटकेचे सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी उपमुख्यमंत्री तर अजित पवार नंतर आमच्यासोबत आले तेही उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आज मी मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, गुजरातधार्जिण्या सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, …
Read More »उदय सामंत यांचा दावा; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ, भाजपाचा दुजोरा नाही देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केली त्यानुसार पत्र घेऊन राजभवनावर दिले
महायुतीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवरून रस्सीखेच सुरु झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गृह मंत्री पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रही राहिले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपाचे नेते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार या दोघांचेच नाव छापण्यात आले. त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी समारंभात …
Read More »पार्ट-२ मध्ये पुन्हा एकनाथः शिवसेना सहभागी होण्याची शक्यता? आम्हा सगळ्यांचं करिअर एकनाथ शिंदेंच्या हातात, त्यांना डावलून कोणी काही केलं तर... उदय सामंतांचा इशारा
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडत आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र २०१४ साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पार्ट वन असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावेळी त्या …
Read More »महायुतीत “सब कुछ (ठिक) ठाक है” एकनाथ शिंदे यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम देवेंद्र फडणवीस यांची विनंतीः गाडी अडली गृहमंत्री पदासाठी
राज्यात संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मंत्री पदाच्या वाटपावरून महायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचे चर्चा सुरु झाली आहे. महायुती सरकारने रितसर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्या संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महायुतीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र राज्याचे विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र सरकारमध्ये …
Read More »सत्ता स्थापनेच्या निमंत्रणानंतर महायुतीच्या नेत्यांचे पत्रकार परिषदेत एकमेकांना चिमटे अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांना चिमटा तर एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना धक्का
राज्यात सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केल्यानंतर अखेर राज्यात महायुतीचे सरकार स्थानापन्न होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महायुतीच्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत एकमेकांना चिमटे आणि धक्के दिले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी राहिलेले एकनाथ शिंदे हे उद्याच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे …
Read More »अखेर महायुतीने दुपारी ३ वाजता राज्यपालांकडे जात केला सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या दाव्यानंतर राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण
राज्यातील संशयातीत बहुमतानंतर महायुतीतील सहभागी पक्ष असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्ष, अजित पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दुपारी ३ वाजता राजभवनावर जात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा नेमका कोणाला टोला, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे अडीच वर्षात कोणी सोडून गेलं नाही- जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला
राज्यातील महायुतीला संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा घोळ तब्बल १० दिवस सुरु राहिला. त्यानंतर आज विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेते पदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित या बैठकीला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya