आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड बाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिक्षा…. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराडच

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने १५ हजार पानांचे आरोपपत्र बीडच्या न्यायालयात दाखल केले. या हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यालाच आरोपी ठरविण्यात आले आहे. तसेच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणात आडवे आल्याने केली असल्याची बाबही पुढे आली आहे. तसेच या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

ठाणे येथील पोलिसांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेत आणि सर्व पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले आहे. आता कोर्टालाही आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी. याप्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे, मला विश्वास आहे की, त्या कठोर शिक्षा सुनावली जाईल असा आशावादही यावेळी व्यक्त केला.

वाल्मिक कराडच्या विरोधात बीडमधी अवाधा कंपनीकडून दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड याचा आवाज आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांचे आवाजाचे एकमेंकांशी जुळणारे नमूने, हत्या प्रकरणातील आरोपींचा खंडणीशी असलेला संबध दाखविणारे सीसीटीव्ही चित्रणे यासह सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल केले.

त्याचबरोबर या प्रकरणात १८० साक्षिदार, पंच यांच्या मदतीने तपासानंतर दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडच असल्याची माहिती पुढे आल्याने त्यास एक नंबरचा आरोपी बनविण्यात आले आहे.

About Editor

Check Also

शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

देशात सुरु असेल्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *