केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्यावरून दिल्लीत सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याच संसदेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर मविआचे घटक पक्ष …
Read More »उच्च न्यायालयाने अदानीच्या विरोधातील याचिकाकर्त्याला ठोठावला ५० हजाराचा दंड अदानीला वीज पुरवठ्यासाठीचे कंत्राट देण्याचा निर्णय योग्य
राज्यात औष्णिक वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानी ट्रान्समिशनला देण्याचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अदानी ट्रान्समिशला दिलेल्या ६६०० मेगावॅटच्या कंत्राटाबाबत केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे निरीक्षण मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रिट …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, परभणीत कोंबिग ऑपरेशन करू नका… पोलिसांना दिले आदेश अवैध पद्धतीने आंदोलन करणाऱ्यावर कडक कारवाई करा
परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना झाल्यानंतर त्यावर तेथील स्थानिक दलित समाजाची प्रतिक्रिया उमटली. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी परभणी बंदची हाक दिली. मात्र या परभणी बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान काही जणांनी अज्ञात समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत जाळपोळीच्या घटना घडवून आणल्याचे …
Read More »राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी या आमदारांना निरोप भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेच्या या आमदारांना फोन
राज्य सरकारने मुंबईतील तीन दिवसीय विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करून दाखविल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ४ वाजता नागपूरातील राजभवनात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात तिन्ही पक्ष अर्थात भाजपा, अजित पवार यांचा …
Read More »मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला निषेध
सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …
Read More »राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदीः उपाध्यक्ष पद मविआकडे? अध्यक्षपदासाठी एकट्या नार्वेकरांचा अर्ज
विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर रितसर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर आयोजित विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. निवडणूकीत महायुतीला २३१ जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत महायुतीच्या बाजून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदीही भाजपाकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान आता वर्षा बंगला, तर… मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून सागर बंगला?
राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरील असे मिळून तिघांचा शपथविधी नुकताच पार पडला. परंतु मागील अनेक दशकांपासून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगला मात्र यापुढे मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री म्हणून रहात असलेला सागर बंगला मात्र …
Read More »उपमुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांवर टीका, विरोधकांनी रडगाण बंद… वेगवान सरकारची अडीच वर्षाची कारकिर्द यशस्वी ठरली
विरोधकांकडून गेली अडीच वर्षे आमच्यावर सातत्याने खालच्या भाषेत टीका करण्याचे काम केले. या विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यामुळे त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करत बसू नये. आता विरोधकांनी जुनं रडगाणं बंद करुन विकासाचं नवं गाणं गावं असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. पुढे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बदल्यांचे नव्हे तर बदल करण्याचे राजकारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळचे राजकारण खूप वेगळे राहणार आहे. मला बदल्यांचे नाही तर बदल घडविण्याचे राजकारण करायचे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya