दिव्यांगाना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही व्हेईकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रीमंडळ बैठकीनंतर श्रीमती पुष्पा सागर कांबळे, माणिक रामचंद्र भेरे,धनाजी बळवंत दळवी, मधुकर हरी बोंद्रे, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, सगेसोयरे व्याख्येसंदर्भातील ४ लाख हरकतींची नोंद
राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडणार
बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे. राज्यात ‘उमेद’ अभियानात ६० लाख तर ‘माविम’च्या माध्यमातून १५ लाख महिला सदस्य असून दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभ …
Read More »एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्प
देशातील पहिल्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, वैभव …
Read More »राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातून बंद्यांना राज्यमाफी
केंद्र शासनाच्या धोरणानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त विशिष्ट प्रवर्गातील व विहीत निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षा बंद्यांना शिक्षेत राज्यमाफी देण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच बंद्यांची मुदतपूर्व मुक्तता होऊन, ते आपल्या कुटुंबात गेले आहेत. कारागृहातील चांगली वागणूक हा राज्यमाफी या योजनेचा मूलभूत निकष आहे. कारागृहात असताना वर्तनात सुधारणा करून …
Read More »शरद पवार म्हणाले, शेतकरी वर्गात सरकारविरोधात प्रचंड नाराजी
राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार म्हणाले की, नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी …
Read More »लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमीपूजन
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमीपूजन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर
महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणूक यामध्ये देशात अव्वल असून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या भीतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ३३ मोठे निर्णय
लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधीही जाहिर होऊ शकते या भितीने राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विभाग आणि राज्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे निर्णय घेतले. तर राज्य सरकारकडून …
Read More »
Marathi e-Batmya