गजबजलेल्या मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो

नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथील ईस्टर्न फ्रि वे मार्गावरील एक अवास्तव होर्डींग कोसळून झालेल्या अपघातात १४ निष्पापांचा प्राण गेला. तसेच अनेक वाहनांचे नुकसान आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जाण्याची पाळी तीन दिवसांपासून या भागात आहे. मात्र आज संध्याकाळच्या पीक आव्हरला मुंबईकरांसाठी महत्वाची असलेल्या मेट्रोला बंद ठेवत आणि महामार्गावरील वाहतूक तिसरीकडे वळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने विक्रोळी ते घाटकोपर या २.५० ते ३ किलोमीटर लांबीचा रोड शो केला.

वास्तविक पाहता घाटकोपरमधील दुर्दैवी घटनेनंतर या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी जाणीवपूर्वक भावनिक राजकारण करण्यापासून स्वतःला दूर ठेवले. तसेच मुंबईकरांनीही या घटनेनंतर काही प्रमाणात संयम बाळगला आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणूकी व्यस्त असलेल्या एकाही राजकिय पक्षाच्या नेत्याने जाहिर सभांमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल जाहिररित्या एकाही शब्दाने वाच्यता केली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणताही राजकिय पक्ष या भागातून रोड शो करण्याचे धाडस करू धजावत नव्हता. मात्र या अटकळीला भाजपाने झटकून टाकल्याचे दिसून येते.

आधीच लोकल ट्रेन, बस आणि मेट्रोने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कशीबशी गर्दीतून वाट काढत आपल्या घरी पोहोचण्याची घाई लागलेली असते. त्यामुळे एखादा नवखा प्रवासी जरी मुंबईत आला तर तो गर्दीच्यावेळी प्रवास करण्याचे टाळतो. असे असताना भाजपाने आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित केला. या रोडशो साठी सायन पनवेन मार्गावरील विक्रोळी ते घाटकोपर दरम्यानची वाहतूक वेगळ्या दिशेने वळवली. त्याचबरोबर अंधेरी ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोची सेवाही सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली.

इतका सगळा त्रास सर्वसामान्य मुंबईकर आणि चाकरमान्यांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो कशासाठी आयोजित केला असा सवाल मुंबईकरांकडून भाजपाला करण्यात येत आहे. तसेच एकाबाजूला मुंबईकरांसाठी मोठमोठ्या बाता मारायच्या आणि दुसऱ्याबाजूला त्यांच्याच जीवावर सत्ता मिळविण्यासाठी त्यांनाच त्रास द्यायचा हे कोणत्या नैतिक गोष्टीला धरून आहे असा खोचक सवालही भाजपाला या भागातील सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *