Tag Archives: Harshwardhan Sapakal

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर …

Read More »

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हर्षवर्धन सपकाळ, सचिन सावंत यांची प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन, पंतप्रधान मोदी प्रचंड दबावात, सरकारचे अपयश व जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा भावना दुखावल्या गेल्याबद्दल शिवप्रेमींची दिलगीरी व्यक्त करतो: हर्षवर्धन सपकाळ

भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरे नाव खपवून घेणार नाही सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या!

नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधा-यांकडून ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी कामगारांना कोणाच्या दबावाखाली सोडले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेलं पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भारतीय जनता पक्षाला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित नाईक निंबाळकरला तात्काळ अटक करा

राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केल आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मग मागासवर्गीयांना ४२% आरक्षण देणार का? आरक्षणाच्या नावाखाली मराठा व ओबीसी समाजात भांडण लावले, फडणवीसांच्या शब्दावर किती विश्वास ठेवणार?

राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, लोकशाही व संविधान गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींनो ‘चले जाव’ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्ष व सामाजिक संघटनांची पदयात्रा व हुतात्म्यांना आदरांजली

आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून ती लोकशाही व संविधान गिळंकृत करु पहात आहे. आज या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असून देशाला घातक असलेल्या या प्रवृत्तीला ‘चलो …

Read More »