Tag Archives: kapil patil

जुन्या पेन्शनबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा आश्वासन, कर्मचारी, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर… जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, …

Read More »

भाजपाच्या या केंद्रीय मंत्र्यांकडे त्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी

केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा, महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू होत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, …

Read More »

महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्याकडे आरोग्य केंद्र बंद करून त्याच्या बाजूला मंदिर उघडू मंदिरप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे भाजपा, मनसेला खोचक उत्तर

ठाणे : प्रतिनिधी मागील अनेक महिन्यांपासून भाजपाकडून राज्यातील प्रार्थनास्थळे, मंदिरे खुली करण्याबाबत महाविकास आघाडीच्या विरोधात कधी घंटानाद, तर कधी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. तसेच मनसेनेही मंदिरे उघडण्याप्रश्नी घंटानाद आंदोलन केले. याप्रश्नी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वक्तव्य करत प्रार्थनास्थळे उघडणार असल्याचे स्पष्ट संकेत देत धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत, हरकत …

Read More »

जाती जनगणना झाली नाही तर आरक्षण टिकणार नाही ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी जाती जनगणना झाली नाही तर कोणतंच आरक्षण टिकणार नाही. मंडलला कमंडलचा विरोध आहे हे लक्षात घेऊन एक व्हा असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज केलं. ओबीसी आरक्षण दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. मंडल आयोगाच्या अमंलबजावणीची घोषणा याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान व्ही. …

Read More »

शिक्षकांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाने ही अट काढून टाकली रेशनकार्डची अट नसल्याबाबत शिक्षण विभागाचा खुलासा - शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सुरुवातीला शिक्षण विभागाने रेशन कार्ड असण्याची अट शिक्षकांना बंधनकारक केले. मात्र याप्रश्नी शिक्षक भारती संघटनेने पाठपुरावा सातत्याने करून रेशनकार्डची अट काढून टाकण्यास राज्य सरकारला बाध्य केले. त्यानुसार अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सदरची अट काढून टाकण्याचे आदेश दिल्याने अखेर शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपुर्ती …

Read More »

अखेर शालेय शिक्षण मंत्र्यांकडून तो आदेश रद्द; जुनी पेन्शन झाली लागू राज्यातील सर्व १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा

मुंबईः प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर आज शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सही केली. १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी …

Read More »

केंद्राचे शिक्षण धोरण म्हणजे देशाचा उलटा रोडमॅप शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी देशातील नवी पिढी घडविण्यासाठी तब्बल ३० वर्षानंतर केंद्र सरकारने नवे शिक्षण धोरण तयार करत आज त्यास मान्यता देण्यात आली. मात्र या धोरणामुळे देशाला मागे घेवून जाणारा उलटा रोडमॅप असल्याची टीका शिक्षक भारती प्रमुख तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. 1) गरीब आणि बहुजनांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित ठेवणारं. 2) …

Read More »

२२ जुलैला शिक्षक भारती करणार राज्यव्यापी पोस्टर आंदोलन शिक्षक संघटनेचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारती बुधवारी २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करणार आहे.  जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकारी अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक …

Read More »

प्रत्यक्ष अन्यथा ऑनलाईन शाळा जूनमध्येच सुरु झाल्या पाहिजे मुख्यमंत्र उध्दव ठाकरे यांचे शिक्षण विभागाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या …

Read More »