राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामध्ये विशेषतः महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ हा नवीन उपक्रम तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांपर्यंत जलदगतीने पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा उपक्रम राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा
महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून ७-८ वेळा निवडणूक लढवलीय आता… सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत जनताच निर्णय घेईल
मागील काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यातच अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. या निमित्ताने महिला वर्गाला आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यदिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम राबवणार जनसन्मान यात्रेला पाच दिवसात अभूतपूर्व प्रतिसाद ;महिलांची उपस्थिती लक्षणीय...
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात व प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता. देशाचे संविधान हा …
Read More »अजित पवार २४ दिवसात ३९ विधानसभा मतदारसंघात संवाद साधणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होणार असून त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच …
Read More »अजित पवार यांच्या ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने समन्वयकांची नेमणूक राज्यातील दौऱांची जबाबदारी या पदाधिकारी आणि मंत्र्यांवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व महायुती सरकारने केलेले जनसेवेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार असून या जनसन्मान यात्रेसाठी ७ समन्वयकांची तर ८ सहसमन्वयकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. जनसन्मान यात्रेसाठी समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे …
Read More »… तोपर्यंत टोल वसुली थांबवा; अजित पवार यांचे आदेश महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा
महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार वेश बदलून का जात होते? एका बाजूला राष्ट्रवादीवर आरोप आणि दुसरीकडे अजित पवारांसोबत बोलणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, आदिवासी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा आदिवासी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान द्या...
राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा. वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थात्मक पिककर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील ९६९८ आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा. आदिवासींच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती,अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधूनच जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करा
राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे आवाहन करत अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या …
Read More »
Marathi e-Batmya