राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. …
Read More »महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे सकाळच्या सत्रात उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम
उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी …
Read More »महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना महावितरणचा आयपीओ येणार ; कृषि वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती व इतर सर्व बिगर कृषि ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषि ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) असे विभाजन करून दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज १६% ने महाग होणार महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची लूट
राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ५ वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी केले जातील व पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात केली जाईल असे सांगितले होते पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. वीजदर कमी होणार नसून ते १६ टक्क्यांनी महाग होणार आहेत, असा …
Read More »‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेत पुरस्काराचे वितरण
इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य ‘आयपीपीएआय पॉवर अवॉर्ड्स-२०२६’ मध्ये विविध सहा पुरस्कारांनी शनिवारी गौरविण्यात आले. यात विशेषतः स्मार्ट ग्रिड, रूफटॉप सोलर, बॅटरी स्टोरेज आणि विद्युत वाहन प्रोत्साहन या वर्गवारीमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले. ‘महावितरणने तंत्रज्ञान …
Read More »वीज कनेक्शन हमखास वेळेत मिळण्यासाठी महावितरणची नवी व्यवस्था सात दिवसात शहरी भागात तर ग्रामीण भागात १५ दिवसात नवे वीज कनेक्शन कार्य पद्धतीत बदल
ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसात, शहरांमध्ये सात दिवसात आणि ग्रामीण भागात १५ दिवसात नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पहावी लागणार नाही, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महावितरणकडून …
Read More »महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ग्राहकांना सुविधा, ५८ हजार ग्राहकांना लाभ ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ
वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला असून दोन महिन्यात ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या नावात बदल (चेंज ऑफ नेम) करून घेतला. त्याचसोबत वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा १०,४२८ ग्राहकांना लाभ झाला आहे. जीवनसुलभतेसाठी (ईज ऑफ …
Read More »येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार महावितरण चे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत १०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ प्रति युनिट …
Read More »महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये १९ टक्के वाढ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम …
Read More »पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार वीज ग्राहकांसाठी उपयुक्त अशा योजनांवर भर द्या
घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात २५,०८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसविल्यामुळे राज्याने शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला. सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya