Tag Archives: nana patole

नाना पटोले म्हणाले, ‘भारत जोडो यात्रे’ मुळेच रा.स्व. संघाला मुस्लीम समाज आठवला

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून जाती-धर्मात तेढ निर्माण करुन व्देषाचे राजकारण करणाऱ्या पक्ष, संघटनांचे धाबे दणालेले आहेत. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून आपले इस्पित साधणाऱ्या भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पायाखालची वाळू या पदयात्रेमुळे सरकली आहे म्हणूनच आरएसएसला मुस्लीम समाजाची आठवण झाली असून सरसंघचालक …

Read More »

नाना पटोले म्हणाले, भाजपाचा तो दावा खोटा… देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे ?

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी …

Read More »

राहुल गांधी यांच्यासाठी प्रदेश काँग्रेसने केले ‘हे’ दोन ठराव मंजूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे …

Read More »

नारायण राणे म्हणाले, त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही काँग्रेस, शिवसेनेला दिला इशारा

फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथील रिफायनरीला विरोध केला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प नाणारऐवजी बारसू गावात करण्याची तयारी दर्शविली. त्यातच आता या प्रकल्पावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकणचा दौरा करत स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर या रिफायनरी प्रकल्पाला …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवारांना उत्तर द्यायला वेळ नाही मला बरीच कामे आहेत नाना पटोले यांना अधूनमधून झटके येतात

बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरून आणि शिंदे समर्थक आमदारांच्या वक्तव्यावरून चांगलीच टीका केली. तसेच वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या अजित पवार यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे त्यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा सवालः डोळे काढू, मुंबईत चालणे-बोलणे महाग, अशा धमक्या देणाऱ्यांना कोणाचा आशिर्वाद ? खुलेआम धमकी देणाऱ्या सत्ताधारी खासदार-आमदारांना चाप लावा

राज्यात सत्ताबद्दल होऊन भाजपाची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार व आमदारच डोळे काढण्याची, हायपाय तोडण्याची भाषा करत आहेत. राज्य सरकारने अशा सत्ताधारी गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सरकारी व भाडोत्री गर्दी ? लम्पी आजाराने जनावरे दगावलेल्यांना आर्थिक मदत करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेस गर्दी जमण्यासाठी पैसे वाटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांनी या सभेला हजर रहावे असे लेखी आदेश महिला व बालकल्याण विभागाने दिल्याचे समजले. हा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी असे लेखी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, …ही तर भाजपाची बौद्धिक दिवाळखोरीच काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ला मिळणाऱ्या प्रतिसादाने भाजपाला भरली धडकी

देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुलजींच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच …

Read More »

भाजपाने राहुल गांधीच्या टी-शर्ट वरून साधला निशाणा: काँग्रेसचा सवाल, घाबरलात की काय? भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगले ट्विट वॉर

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने सुरु केलेल्या भारत जोडो पदयात्रेचा आज तिसरा दिवस या पदयात्रेची सुरुवात कन्याकुमारी येथून बुधवारी ७ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून …

Read More »

गेले अशोक चव्हाण कुणीकडे? जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेला गायब आज सोमवारच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा मुंबईत येताच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकते नाहीत. आयोजित केलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेस चव्हाण यांनी दांडी मारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अधिक खळबळ माजली आहे. आता हाही योगायोग असावा का असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे …

Read More »