Tag Archives: nana patole

भाजपाने राहुल गांधीच्या टी-शर्ट वरून साधला निशाणा: काँग्रेसचा सवाल, घाबरलात की काय? भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगले ट्विट वॉर

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने सुरु केलेल्या भारत जोडो पदयात्रेचा आज तिसरा दिवस या पदयात्रेची सुरुवात कन्याकुमारी येथून बुधवारी ७ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून …

Read More »

गेले अशोक चव्हाण कुणीकडे? जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेला गायब आज सोमवारच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा मुंबईत येताच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकते नाहीत. आयोजित केलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेस चव्हाण यांनी दांडी मारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अधिक खळबळ माजली आहे. आता हाही योगायोग असावा का असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, अमित शहा यांना गणराया देश हिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी ७ सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा!: जितु पटवारी

सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुलजी …

Read More »

चव्हाण-फडणवीसांच्या भेटीवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल भेटीबाबत आणि चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या अफवा

गुरूवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचे वृत्त आज बाहेर येताच अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे जर भाजपात गेले तर चव्हाण यांचे समर्थक असलेले एकूण …

Read More »

नाना पटोले म्हणाले, कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंटबाजी हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, तथाकथीत जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर गांधी कुटुंबावर खोटे आरोप करणारे गुलाम नबी आजाद कृतघ्न

काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला. परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी हे लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. गांधी परिवाराने या नेत्यांना सर्व महत्वाची पदे दिली पण आज त्याच गांधी परिवाराविरोधात चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनाही पक्षाने व गांधी कुटुंबाने …

Read More »

भाजपाचा सवाल, उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

एकाबाजूला शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेतून अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकटे पडत असल्याचे दिसत असतानाच आज संभाजी ब्रिगेड या संघटनेने शिवसेनेशी युती करत असल्याचे उध्दव ठाकरे यांची …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मंत्री सत्तार, आ. बोरनारे यांना शिंदे-फडणवीस पाठीशी घालणार का ? टीईटी घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे

टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचेही प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशाप्रकारे किती जणांना अशा गैरमार्गाचा लाभ झाला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; चौकशी करून दोषींना शिक्षा द्या

राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही, शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघाती हल्ला …

Read More »

नाना पटोले म्हणाले, २०१४ पासून लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार महागाई, बेरोजगारीसह जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर केंद्र सरकार फेल

लोकशाही व संविधानाच्या तत्वांवर देशात आजपर्यंत सरकारे काम करत होती परंतु २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हुकूशाही पद्धतीने काम करत आहे. २०१४ पासूनच देशात आणीबाणी सुरू असून विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी व विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय, आयकर सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे, असा …

Read More »