सध्या ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपाकडून आंदोलन इशारा आणि सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयात सुणावनी सुरु …
Read More »उच्च न्यायालयाचे आदेश, “ईडी, नवाब मलिकांच्या अटकप्रकरणी उत्तर द्या” न्यायालयाचे ईडीला आदेश
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुणावनीवेळी न्यायालयाने मलिक यांना अटक केल्यासंदर्भात उत्तर द्यावे असे आदेश दिले. ईडीने भल्या सकाळी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी जावून काही वेळ तपास करत चौकशी केली. त्यानंतर त्यांना …
Read More »…तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्या बुधवार २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात वेगळंच वातावरण…पटत नाही… रायगड येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत
मागील दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, आमदारांच्या आणि नुकतेच महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या घरावर छापे मारण्यात येत आहेत. तसेच या छापेममारीवरून रोज सत्ताधारी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात राज्यातील वातावरण बदलल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यात …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मविआचा प्रभाग पध्दतीचा कायदा राज्यघटनेला छेद देणारा “एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य'' या संकल्पनेला बसतोय छेद
काही महिन्यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दती लागू करत सदस्य संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने नवा कायदा आणत विधिमंडळाची मान्यता घेतली. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नव्याने प्रभाग आणि वार्डांच्या सीमा नव्याने निर्धारीत करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या नव्या कायद्यामुळे राज्यघटनेतील “एक व्यक्ती-एक …
Read More »वकीलांच्या उपस्थितीत नवाब मलिकांच्या चौकशीस न्यायालयाची परवानगी पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या तीन मागण्यांना दिली मंजूरी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यत ईडीची कोठडी पीएमएलए न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना घरचे जेवण मिळावे, तसेच वकीलांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी करण्यात यावी, घरचे जेवण घेण्यास परवानगी आणि औषधोपचार घेण्यास परवानगी मिळावी याबाबत विनंती अर्ज आज मलिकांचे वकील अमित देसाई यांनी पीएमएलए न्यायालयात एका अर्जान्वये …
Read More »मलिकांच्या अटकेवर फडणवीस म्हणाले, “…तर असा संदेश जगभरात जाईल” कायदेशीर अडचण निर्माण होईल
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. या अटकेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापार्श्वभूमीवर …
Read More »नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचा मोठा निर्णय राजीनामा घ्यायचा नसल्याचा निर्णय
भाजपाचे ड्रग्ज पेडलर आणि बनावट नोटा रॅकेटशी असलेल्या संबधाचा पर्दाफाश करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दुपारी ईडीने अटक केली. त्यानंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आणि मविआ नेत्यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक दोषी …
Read More »मलिकांच्या अटकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, आता नवाब मलिकांनी… ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांनी राजीनामे दिले
पहाटेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पोहचत त्यांच्या घराची झडती घेत मलिक यांना ताब्यात घेवून ईडी कार्यालयात आणले. त्यानंतर तब्बल आठ तास ईडीने चौकशी करून नवाब मलिक यांना अटक केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत, आता मलिकांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी …
Read More »राज्यात सुरु असलेले सुडाचे राजकारण आज जरी जनता पहात असली तरी… नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा
महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते. मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसर्या दिवशी करमाळा येथे सभा झाली. …
Read More »
Marathi e-Batmya