Tag Archives: ncp

एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, त्यांनी सिध्द करावे… भाजपाची बी टीम नसल्याचे सिध्द करावे

देशातील सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी राज्यात निवडणूक आघाड्यांच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. एमआयएमने आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने या युतीसंदर्भात झिडकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंत्यत सावध भूमिका मांडली असून याप्रश्नी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमने आधी ते भाजपाची बी …

Read More »

एमआयएम खासदार जलिल म्हणाले, मते हवीत ना? मग या युती करा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला प्रस्ताव

२०१४ सालापासून एमआयएमकडून देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करून निवडणूकीत उतरत आहे. एमआयएमला मिळणाऱ्या मतांमुळे काँग्रेससह अनेक पक्षांना विशेषत: बिगर भाजपातेर पक्षांना फटका बसत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षावर भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सगळं संपवायचेय ना? भाजपाला पराभूत …

Read More »

संजय राऊतांचा भाजपावर पलटवार, ज्यांचे आव्हान असते त्यांच्याच विरोधात बोंब… भाजपावाले रोज शिमगा करतायत

राज्यातील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये भाजपाच सत्तेवर येईल असे विश्वास व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा पुन्हा सत्तेत येवू देणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या तरूण आमदारांना दिले. या दोघांच्याही वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत भाजपावर मात्र टीकास्त्र सोडले आहे. शऱद …

Read More »

राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला “निरोप” तर भाजपाला “नमस्कार” चा संकेत ५ एप्रिलला घेणार अंतिम निर्णय

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आलेली असताना भाजपाच्या राजकिय हल्ल्यामुळे आणि अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे पिछाडीवर पडत असलेल्या मविआला आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी “निरोपाचा” इशारा तर भाजपाला “नमस्कार” चे संकेत दिले असून ५ एप्रिल रोजी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभेवर भाजपाचा भगवा फडकाविल्यानंतर गोवा …

Read More »

न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले, चुकीचे असेल तर कारवाई व्हावी पण… माझ्यावरील कारवाई सूडबुद्धीने - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

मुंबई बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयानेही दरेकर यांच्यावर सोमवार पर्यत कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश राज्य सरकारला देत सोमवारी याप्रकरणी सुणावनी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले की, या कारवाईला मी मुळीच …

Read More »

अजित पवारांचा काश्मीर फाईल्स चित्रपटावरून भाजपाला टोला केंद्रानेच करमुक्त करावा म्हणजे तो सबंध देशभरात निर्णय लागू होईल

काश्मीर मधील एकंदर परिस्थितीवर आधारीत काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच रिलीज झाला या चित्रपटाबाबत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल्याने या चित्रपटाला महाराष्ट्रातही करमुक्त करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत होती. तोच धागा पकडत मागील तीन दिवसापासून अर्थसंकल्पावरील चर्चेला आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना म्हणाले की, …

Read More »

संसदेतच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांना सुप्रिया सुळेंनी सुनावले, आई-बाप काढायचे नाहीत काश्मीर प्रश्नावरील चर्चे दरम्यान झाली शाब्दीक खडाजंगी

पाच राज्यातील निवडणूकीनंतर पुन्हा एकदा संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून आज काश्मीर प्रश्नी संसदेत चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावत आई-बाप काढायचे नाहीत असा सज्जड दमच भरला. लोकसभेमध्ये सोमवारी जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरमधील …

Read More »

फडणवीसांच्या पहिल्या पेन ड्राईव्हची चौकशी सीआयडीकडे, पण महाजन सुटले तर आनंदच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे उत्तर

राज्यातील विरोधकांना संपविण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यासोबत हात मिळवणी करून कट कारस्थान रचली जात असल्याचा आरोप पहिल्या पेन ड्राईव्हद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस केला. त्याची चौकशी सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रविण चव्हाण याने आपल्या वकील पदाचा राजीनामा दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील …

Read More »

आणि अर्थसंकल्पावरून फडणवीसांनी केले अजित पवारांचे कौतुक विधानसभेत अर्थसंकल्पिय चर्चेवेळी केले कौतुक

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पातील तरतूदींवरून आणि त्यातील युनिक कल्पनांवरून विरोधकाकडून अर्थमंत्र्यांचे कौतुक केल्याची घटना घडली आहे. वास्तविक पाहता राजकिय वर्तुळात त्यातही विशेषतः सत्ताधारी आणि विरोधकांकडून एखाद्या तरतूदीवरून किंवा बाबीवरून विधिमंडळाच्या सभागृहात कौतुक करण्याची घटना तुरळकच असते. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. अजित …

Read More »

मंत्री भुजबळ म्हणाले, जोपर्यंत शरद पवार यांची शक्ती सरकारच्या मागे तोपर्यंत… राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त राज्य सरकार संपुर्ण राज्यात विविध कार्यक्रम राबवणार

राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी सरकार आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारे सरकार आहे. जो पर्यंत या सरकारच्या पाठीमागे शरद पवार नावाची शक्ती उभी आहे, तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काहीही होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले …

Read More »