आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही सरकारचे …
Read More »विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने जयंत पाटील म्हणाले, तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका… अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील निलंबित
आज विधानसभेत फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुढे आणण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरळीत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे विरोधक आपल्याच …
Read More »दिशा सालियनप्रकरणी फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, तीच्या आईवडीलांची तरी… सीबीआयला त्यात काही आढळून आले नाही
विरोधकांच्या फोन टॅपिंगच्या मुद्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपाने पध्दतशीरपणे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण बाहेर काढले. तसेच सत्ताधारी आमदारांच्या मागणीनुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्याची घोषणाही विधानसभेत केली. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सालियनच्या आई-वडीलांनी केलेल्या आवाहनाची …
Read More »अजित पवार म्हणाले,.. ती अध्यक्षांची जबाबदारी, तर अध्यक्ष म्हणतात विशेषाधिकार समितीत जा अध्यक्ष राज्य सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग
विधानसभा सदस्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी राज्य सरकारने सादर केलेल्या क्लोज रिपोर्टवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या प्रश्नी नियम ५७ अन्वये चर्चेची मागणी विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, विधानसभा सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे ही विधानसभा …
Read More »छगन भुजबळ यांच्या फोटो मॉर्फिंगप्रकरणी भाजपाच्या भातखळकरांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर …
Read More »कोंबडी शब्दावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळः भुजबळांनी शब्द मागे घेतला अजित पवारांनीही व्यक्ती केली दिलगिरी
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दुपारी मुंबईप्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कोंबडी असा शब्द प्रयोग करताच भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. दुपारच्या सत्रात मुंबईवरील चर्चेच्या वेळी छगन भुजबळ हे बोलायला …
Read More »उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शहरातच मुलीचा दुर्दैवी मृत्यूः अजित पवारांनी धरले धारेवर व्हेंटीलेटरअभावी अंबूबॅग दाबून वीस तास कृत्रीम श्वासोच्छवास देणाऱ्या आई-वडीलांसमोरच मुलीचा मृत्यू होणे ही दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब
राजकारणातील सध्या हुकमी एक्का असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी...
घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय… मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…छत्रपती …
Read More »विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना सवाल, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार भूमिका घेता का? अखेर प्रश्न राखून ठेवण्याची राज्य सरकारवर आली पाळी
विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ताराकिंत प्रश्न आपण पाठविला होता. मात्र त्यातील प्रश्नाशी संबधित असलेले दोन मुद्दे परस्पर वगळले. हे मुद्दे का वगळले असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अजित पवार यांनी करत हा मुद्दा आपण …
Read More »एनआयटी भूखंडप्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले, एकनाथ शिंदेला कोण कशाला देईल ३५० कोटी रू. विरोधकांच्या आरोपांवर दिले उत्तर
नागपूर येथील एनआयटीच्या जमिनी न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जमिन घोटाळ्याचे आरोप सुरु झाले. यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनीही वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर आज विधान परिषद आणि विधानसभेत यासंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. तर विधान परिषदेचे कामकाज बंद पाडण्यात विरोधकांना यश आले. या जमिन घोटाळ्याचा मुद्दा …
Read More »
Marathi e-Batmya