Tag Archives: ncp

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी...

घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय… मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…छत्रपती …

Read More »

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना सवाल, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार भूमिका घेता का? अखेर प्रश्न राखून ठेवण्याची राज्य सरकारवर आली पाळी

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास सुरु होताच विरोधी पक्षनेते  अजित पवार यांनी ताराकिंत प्रश्न आपण पाठविला होता. मात्र त्यातील प्रश्नाशी संबधित असलेले दोन मुद्दे परस्पर वगळले. हे मुद्दे का वगळले असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अजित पवार यांनी  करत हा मुद्दा आपण …

Read More »

एनआयटी भूखंडप्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले, एकनाथ शिंदेला कोण कशाला देईल ३५० कोटी रू. विरोधकांच्या आरोपांवर दिले उत्तर

नागपूर येथील एनआयटीच्या जमिनी न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जमिन घोटाळ्याचे आरोप सुरु झाले. यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनीही वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर आज विधान परिषद आणि विधानसभेत यासंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. तर विधान परिषदेचे कामकाज बंद पाडण्यात विरोधकांना यश आले. या जमिन घोटाळ्याचा मुद्दा …

Read More »

अजित पवारांची मागणी, कोयता गँग’ला मोक्का लावा, तडीपार करा, दहशत मोडून काढा 'कोयता गँग'मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा

पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते, राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच भाषेत उत्तर… हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी सभागृहात केला उपस्थित...

सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले. यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवारांना, आम्ही तुमच्याकडूनच शिकलो… निधी वाटप आणि कामाच्या स्थगितीवरून अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निधी वाटपाला आणि सुरु झालेल्या कामांना स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्यापेक्षा जास्तवेळा निवडूण आलात. आम्ही तुमच्यापेक्षा कमी वेळा …

Read More »

न्यायालयाचा सवाल तर जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंवर आरोप नागपूरातील जमिन वाटपप्रकरणावरून एकनाथ शिंदे संशयाच्या भोवऱ्यात

नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टची (NIT) जमीन १६ जणांना भाडेतत्त्वावर देण्याचे निर्देश तत्कालिन नगरविकास मंत्र एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भूखंडाचे वाटप झालेच कसे? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, अहो आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ सुरक्षा यंत्रणांवरून भुजबळांनी मांडली सभागृहात कैफियत

हिवाळी अधिवेशन नागपूरात होत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून नागपूर शहर थंडीने गारठले असतानाच राज्याचे राजकिय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विरोधकांनी सीमावादावरून आणि कर्नाटक सरकारचे बेळगावात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरले. मात्र सुरक्षा यंत्रणांकडून आमदारांच्या वाहनांना …

Read More »

अजित पवार यांचा इशारा, कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही विधानसभेत अजित पवारांचा आक्रमक पवित्रा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

विरोधकांच्या हल्ल्यावरून मुख्यमंत्री शिंदे संतापून म्हणाले, ए गपा बसा… अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगाव सीमावासीयांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले. यावेळी विरोधकांचा गदारोळ सुरु असल्याने त्यांनी गप्प बसा असं सांगत फटकारलं. महत्त्वाचं म्हणजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्विटवर खात्यावरुन ट्वीट …

Read More »