छगन भुजबळ यांच्या फोटो मॉर्फिंगप्रकरणी भाजपाच्या भातखळकरांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारवाई करतीला का असा सवाल केला.

विधानसभेतील आमदार दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करीत त्यांना ट्रोल करतात असे असेल तर ही बाब योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या मोबाईलमधील तो फोटो दाखवत हे प्रकार अतिशय गंभीर आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान यावर खरं तर किमान राजकीय नेत्यांनी तरी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मिडियावर आचार संहिता पाळाव्यात असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगत आमदार अतुल भातखळकर यांना समज दिली.

About Editor

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *