Tag Archives: prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता?

सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की, चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, ….संरक्षण मंत्र्याचे खोटे विधान

चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून संरक्षण मंत्र्यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, घराणेशाही संपवण्याचा एकदा निर्णय घ्या

तरुणांच्या हाताला काम पाहिजे का ? विभागाचा विकास झाला पाहिजे का ? हे तुम्ही एकदा ठरवा. यासाठी तुमच्याकडे मोठे हत्यार आहे ते म्हणजे ही घराणेशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लावा. घराणेशाही संपली की, पक्षातला कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला विश्वास संपादन करायचा असतो. त्यासाठी त्याला लोकांशी जुळवून घ्यायचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ?…

नरेंद्र मोदींची वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक कारखाने विकणार असे म्हणत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित उस्मानाबाद येथील जाहिर सभेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८० पासून …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा नवा प्रस्ताव, काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू….

सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आचारसंहिता …

Read More »

वंचितचा आरोप, सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्याने अर्ज मागे घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. वंचित बहुजन …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा

आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या उदासीनतेबद्दल बरेच काही सांगून जाते. यामुळेच वंचित बहुजन आघाडीने त्यांना द्वेषपूर्ण, जातीयवादी आणि मौत का सौदागर असे नाव का दिले आहे हे सिद्ध होत असल्याची टीका नरेंद्र मोदी यांच्यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, NRC आणि CAA कायदा मुस्लिम नव्हे तर VJNT विरोधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते. यावेळी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न

भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत. या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, …

Read More »