Tag Archives: shivsena (UBT)

सुप्रिया सुळे, पटेल यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य,…दोन्ही पदं फार महत्वाची शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यावर दुसरं कुणी बोलू नये

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध …

Read More »

धमकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका, आमचे राजकीय पातळीवर….पण वैयक्तिक… नेत्यांना धमकी देणं खपवून घेणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांसह शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय …

Read More »

“सकाळचा भोंगा…” धमकीचा फोन आल्यानंतर संजय राऊत यांचे फडणवीसांना पत्र सुनिल राऊत यांना आला होता संजय राऊत यांना धमकी देण्याचा फोन

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी एका अज्ञाताने फोन कॉलच्या माध्यमातून दिली. “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली. यानंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र …

Read More »

संजय राऊत यांनी सांगितले ‘त्या’ थुंकण्यामागील सत्य त्र्यंबकेश्वर येथील हिंदू-मुस्लिम प्रकरणावरही केले भाष्य

मागील दोन-तीन दिवस प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऑन कॅमेराच दोन-तीनदा थुंकले. त्यामुळे राऊत यांच्या थुंकण्यावरूनची चर्चा चांगलीच राजकिय वर्तुळात रंगली आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांना त्या थुंकन्यामागचे कारण विचारले असता ते ते म्हणाले, माझ्या जीभेला त्रास होतो. शस्त्रक्रिया झाल्याने …

Read More »

संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटात बिगडले? खा अरविंद सावंत यांनी दिली चर्चेची माहिती ऑगस्ट महिन्यात संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची बैठक होणार

साधारणतः वर्षभरापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात शिवसेनेच्याच ४० आमदारांनी बंड पुकारत भाजपाशी सवता सुभा केला. त्यानंतरही शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेडने युती करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर संभाजी बिग्रेड आणि उध्दव ठाकरे यांच्यात आज मंगळवारी ३० मे शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आल्याची …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा गंभीर इशारा,… ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब न्यायालयाच्या निकालानंतर मोदी सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात केजरीवाल मातोश्रीवर

दिल्ली प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार कोणाकडे यावरून तीन वर्षाहून अधिक काळ सुरु राहिलेल्या न्यायालयीन लढाईत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा विजय झाला. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही दिल्लीतील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार स्वतःकडेच रहावेत या साठी मोदी सरकारने नव्याने अध्यादेश काढत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अप्रत्यक्ष रद्दबादल ठरविला. मोदी सरकारच्या या अध्यादेशाच्या विरोधात …

Read More »

संजय राऊत यांचे संकेत, आघाडीतल्या पक्षांना काही जागांची अदलाबदल… तिन्ही पक्षात समन्वय साधण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातही आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक तर आता अवघ्या एक वर्षावर येऊ ठेवली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तसेच स्थानिक पातळीवरील बैठकांना जोर आला आहे. महाविकास आघाडीतल्या …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, …म्हणून उद्धव ठाकरेंना नाकारले…५० चा आकडाही पार नाही करू शकत राज ठाकरे यांनाही दिला इशारा

गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० …

Read More »

डिएनए टेस्ट करावी लागेल, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर भाजपा-भाजपा युतीतही हा प्रश्न आला होता

कर्नाटक राज्याचा निकाल लागण्याच्या काही दिवस आधी राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा होत होत्या. या सभेच्यावेळी मविआतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून जी भूमिका मांडली जायची नेमक्या त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भूमिका मांडली जात होती. त्यामुळे आघाडीत बिघाडीत निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होण्यास सुरुवात झाली. मात्र कर्नाटक विधानसभेचा …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, हे गणित आहे, म्हणून आता आपण मोठा भाऊ… महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य

कर्नाटक राज्याचा निकाल लागल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांना आणखी वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. तसेच आगामी निवडणूकांची पूर्वतयारी म्हणून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील या गणितामुळे …

Read More »