Tag Archives: shivsena

“त्या” ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील संदोपदी उघड, कदम संशयांच्या भोवऱ्यात माजी आमदार संजय कदम यांच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या कोकणातील मालमत्तांची कागदपत्रे शिवसेनेचे माजी मंत्री तथा नेते रामदास कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्त्ये तथा कदम यांचे पीए प्रसाद कर्वे यांच्या मार्फत पुरविल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम …

Read More »

शेलारांचा निशाणा, तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात १ हजार कोटींचा घोटाळा

मावळ: प्रतिनिधी पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात मावळ मधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु असून यात १ हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मावळ येथे केला. तसेच राज्यातील तीन पक्षांच …

Read More »

मंत्र्यांचे स्पष्ट संकेत, “कॉलेज-महाविद्यालये सुरू होणार मात्र या सणाच्या सुट्टीनंतर” सीईटी निकाल आणि दिवाळीनंतर सुरु होण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आणखी तीन दिवसानंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असताना कॉलेज-महाविद्यालये कधी सुरु होणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टीमुळे परिक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परिक्षा घेण्यात येत असून त्या परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर सर्व …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर फडणवीस म्हणाले, “पोकळ शब्दांची नाही….” प्रत्यक्ष मदत देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी गुलाब चक्रीवादळामुळे विशेषत: मराठवाड्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फटका बसला असून येथील लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेली पीके गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द देत धीर सोडू नका असे आवाहन केले. त्या आवाहनाचा धागा पकडत …

Read More »

मतदार यादीत नावं नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती …

Read More »

प्रविण दरेकरांनी ठोकला हजार कोटींचा दावा मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

मुंबई: प्रतिनिधी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बॅंकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल हे …

Read More »

महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …

Read More »

संजय राऊतांनी अजित पवारांना मिश्किल विनंती करत दिला इशारा अजित पवार मुख्यमंत्र्यांचं ऐकतात आपण त्यांना सांगू

पुणे : प्रतिनिधी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूकांना सामोरे जायचं की स्वतंत्र जायचं याबाबत अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकमत झालेले नाही. त्यामुळे कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसकडून एकला चलो चा नारा देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबरोबरील …

Read More »

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल …

Read More »

नगरविकास मंत्र्यांना म्हणे फाईली वेगळ्या करायला वेळच मिळेना सातारा प्रादेशिक कर्न्झव्हेशनचे धोरण फाईलीवर ८ महिने झाले तरी लाल फितीतच

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महानगर पालिका आणि जिल्ह्यांच्या अनुषंगाने महत्वाचे खाते असलेल्या नगर विकास विभागाकडे सातत्याने विकासात्मक धोरणाला मंजूरी मिळावी यासाठी अनेक फाईली येत असतात. मात्र या विभागाचे मंत्री असलेले आणि शिवसेनेचे वजनदार म्हणून ओळखले जाणारे मंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच फाईली हातावेगळ्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची धक्कादायक माहिती …

Read More »