मुंबई: प्रतिनिधी सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीलाच हातभार लागत असून यात आता मोठ्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या दोन्ही पैकी एका नेत्याने आता हे थाबविण्याची गरज आहे. मला माहित आहे की, नवाब मलिक यांच्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते चिडीने हे सगळं करत आहेत. काल मी …
Read More »मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे ३ निर्णय महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार
मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी …
Read More »पीएचडी-सेट-नेटधारकांसाठी खुषखबर: प्राध्यापक-प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ३७० प्राचार्य व २०८८ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहणार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद नामदेव रणपिसे यांचे २३ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणुकीचे मतदान २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत …
Read More »विधान परिषदेच्या या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीरः ८ आमदार निवृत्त १० डिसेंबरला मतदान तर १४ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या एकूण ७ मतदारसंघातील ८ जागा आमदारांची मुदत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपत आहे. त्यामुळे या ८ जागांसाठी निवडणूक घेण्याऐवजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच मतदारसंघातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. यातून सोलापूर आणि अहमदनगर स्थानिक मतदारसंघातून निवडूण येणाऱ्या जागांसाठी नंतर निवडणूक घेण्यात येणार …
Read More »भाजपाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना विजयी तर अशोक चव्हाणांनी राखली जागा दादरा-नगर हवेलीत कलाबेन डेलकर आणि देगलूर मध्ये जितेश अंतापूरकर
मुंबई: प्रतिनिधी दादरा-नगर हवेलीचे प्रशासकाकडून झालेल्या जाचामुळे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट मागे आत्महत्या केल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि स्व.मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी तब्बल ५० हजाराहून अधिक मताधिक्कांनी विजय मिळविला असून या निमित्ताने शिवसेनेने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर आपले खाते उघडले. …
Read More »स्टोरीचा आता मध्यंतर झालाय.. रेडकरताई, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या षडयंत्राचा भाग-नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी या स्टोरीचा मध्यांतर झालाय. जो पकडून घेऊन जात होता तो तुरुंगात गेलाय. जी लोकं कालपर्यंत जामीन होऊ नये या भूमिकेत होते मात्र स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालीय. क्लायमॅक्स सुरू झाला, काल मध्यांतर झाला आणि आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झाली. पिक्चरबाबत आता संजय राऊतजी यांनी नवाब …
Read More »राज्य सरकारच्या निर्णयानुसार कोणत्या शहरात किती असणार नगरसेवक? जाणून घ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील लोकसंख्यानिहाय नगरसेवकांची संख्या
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकांमध्ये दोन ते तीन सदस्यीय प्रभाग तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय पध्दतीचे प्रभागाच्या निर्णयानंतर पक्षिय बलाबल वाढावे यासाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहर आणि तालुकास्तरावरील लोकसंख्येच्या प्रमाणात कोणत्या शहरात किती नवे नगरसेवक असतील त्याची माहिती …
Read More »मविआ सरकारचा मोठा निर्णय: महानगरपालिका- नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढवली महानगरपालिकांमध्ये १७५ तर नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर …
Read More »विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविणारः शिक्षकांना मिळणार खास प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई: प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …
Read More »
Marathi e-Batmya