Tag Archives: uddhav thackeray

उध्दव ठाकरे म्हणाले, निष्ठेचे कितीही दुध पाजल तरी औलाद गद्दारच बंडखोरांवर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

एक गुलाब गेलं. पण दुसरं गुलाब वाघ आले. नागाला कितीही दुध पाजा. तो चावतो म्हणजे चावतोच! त्या सर्वांना निष्ठेचे कितीही दुध पाजलं तरी औलाद गद्दारच निघाल्या अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जळगाव आणी नाशिक येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे …

Read More »

मुख्य न्यायाधीश रमण्णा म्हणाले, मग तुम्ही आधीच का आलात? नव्याने याचिका दाखल करा उद्या सकाळी पुन्हा होणार सुनावणी

शिवसेनेतील उठावाच्या अनुषंगाने शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्या गटाने एकमेकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी थेट शिंदे गटाच्या वकिलांना मग तुम्ही सर्वात आधी का आलात आमच्याकडे ? असा सवाल करत चांगलेच कोंडीत पकडले. तसेच तुमचे नेमके कायदेशीर मुद्दे …

Read More »

उध्दव ठाकरे यांना रामदास कदम यांचे प्रत्युत्तर, पण ते आता गुलाम… राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम कोण ?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेनेसह देशातील प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले, भाजपासोबत जे गेले आहेत, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण ते आता गुलाम झालेत, त्यांनी भाजपाची गुलामी पत्करली असे खोचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा …

Read More »

संजय राऊत यांना मध्यरात्री अटक, तर दिवसा कोठडी ईडी न्यायालयाने घरच्या जेवणास आणि रात्री १०.३० नंतर चौकशी करण्यास मनाई

गोरेगांव येथील पत्रावाला चाळ प्रकरणात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची काल दिवसभर त्यांच्या घरी आणि संध्याकाळपासून मध्यरात्री पर्यंत ईडी कार्यालयात चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना मध्यरात्रीनंतर ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले असता अखेर न्यायालयाने संजय राऊत यांनी ४ ऑगस्ट पर्यंत …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये नाही तर अवस्था… सत्तेचा फेस गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल

देशात ६०-६५ वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. मात्र आजची त्यांची अवस्था पाहिली की आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये असा खोचक टोला भाजपासह बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावत जे हमाम मे… म्हणून सगळे तिकडे गेलेत. त्या सर्वांच्या शरीरावर सत्तेचा जो फेस आहे तो निघून गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल असा इशाराही शिवसेना …

Read More »

ईडी कार्यालयात जाण्याआधी संजय राऊत म्हणाले, शरण जाणार नाही… शिंदे गटाला टोला लगावत महाराष्ट्र कमकुवत होतोय पेढे वाटा

ईडीने दोन वेळा नोटीस बजाविल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे ईडीने आज रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी धाड टाकत तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेत ईडी कार्यालयाकडे नेले. त्यावेळी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी संजय राऊत म्हणाले, कितीही कारवाई करा …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा भाजपावर निशाणा, दमनशाही, दडपशाही सुरुय… पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसमोर मातोश्रीवर केले संबोधन

पण हे सगळं कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की लाज लज्जा शरम सोडून हे कारस्थान चाललेले आहे. एक दमनशाही, दडपशाही सुरु आहे. हिंदुत्व त्याला हिंदुत्व हा शब्द बोलायचं तेव्हा कुणाचं धाडस होत नव्हत तेव्हा शिवसेनाप्रमुख हा एकमेव मर्द होता या देशामध्ये. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा कुठे होते? …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा, मी मुलाखत देईन तेव्हा देशात भूकंप होईल योग्य वेळी बोलेन, आरोप-प्रत्यारोपाची माझी सवय नाही

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत नेत राज्यात सत्ता स्थापन केली. या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये उघड दोन गट पडले आहेत. त्यातच उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेवर यापूर्वी चुप्पी साधणाऱ्या शिंदे गटाकडून आता ठाकरे कुटुंबियांना प्रत्युत्तर देण्यास …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, कोश्यारींनी…“कोल्हापूर का जोडा नही देखा” त्यांना दाखविण्याची गरज राज्यपालांच्या वक्तव्यावर उध्व ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राज्यात राजकिय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत …

Read More »