Tag Archives: uddhav thackeray

सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणाले, धनुष्यबाण विषयीचा निर्णय आम्ही घेऊ उध्दव ठाकरेंना दिलासा; निवडणूक आयोगाला फटकारले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यास आता १२ खासदारांनीही पाठिंबा दिला. शिंदें गटाकडून आता शिवसेनेवर दावा करण्यात येत असताना आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाकडून …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारावरून उध्दव ठाकरे म्हणाले, आपण पुन्हा गुलामगिरीत… राज्य सरकार आहे कुठे शेतकरी बेहाल

आपण स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. त्यापूर्वी १५० वर्षे ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात होतो. त्यावेळी आपण गुलामगिरीत होतो. पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत ते पुढे म्हणाले की, व्यंगचित्रकारांना एवढंच सांगतो, …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, यांची बावन असतील नाहीतर एकशेबावण पण शिवसेनेला… हर घर तिरंगा म्हणे पण घर नाही त्याने काय करायचे

शिवसेना कोणाची? आणि अपात्रतेच्या मुद्यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मागील काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांनी जाहिरपणे बोलण्याचे टाळले होते. यापार्श्वभूमीवर मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. मात्र …

Read More »

बंडखोर संजय शिरसाट यांची सारवासारव, मोबाईलची तांत्रिक चुक उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आधी पोस्ट नंतर डिलीट

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदारांनी उठाव केला. यापैकी एक असलेले औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट यांनी काल रात्री अचानक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करत त्यांचा विधानसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला. त्यामुळे शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज …

Read More »

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिली. मात्र सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचा तो निर्णय रद्दबातल करत आरे येथेच कारशेड करण्याचे आदेश जारी केले. यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

उध्दव ठाकरे-एकनाथ शिंदे वादात सर्वोच्च न्यायालयाची पुन्हा तारीख १२ ऑगस्टची सुनावणी आता २२ ऑगस्टला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण रोवल्यामुळे सांसदीय राजकारणात आणि कायद्यातील तरतूंदीबाबत काही नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या राजकिय लढाईवर लवकर निकाल लागून कायद्यातील तरतूंदीचा नव्याने अर्थ आणि सासंदीय राजकारणात निर्माण झालेला पेच याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना …

Read More »

शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाले, कोणी वाद वाढवित असेल तर लोक पाठिंबा… वेगळा पक्ष आणि वेगळे चिन्ह घेवू शकतात

जवळपास एक महिन्याहून अधिक काळ शिवसेनेला खिंडार पाडत वेगळा मार्ग स्विकारलेल्या एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. तसेच यासह अनेक प्रश्नांवरून सर्वोच्च न्यायालयात लढाईही सुरु आहे. तरीही नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

पहिल्या विस्तारात डावलूनही बच्चू कडू म्हणाले, शब्द दिला होता पण… नाही मिळालं तरी चांगलं

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी सेनेत बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवित त्यांच्यासोबत गेले. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडू यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, …

Read More »

निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांची ‘ती’ विनंती केली मान्य दिली चार आठवड्यांची मुदत

शिवसेनेतील बंडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील कायदेशीर लढाई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसानंतर सुनावणी होणार आहे. मात्र निवडणूक आयोगास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली असली तरी पक्ष नेमका कोणाचा याप्रकरणी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरु ठेवण्यास एकप्रकारे मान्यता दिली. या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात नुकतीच केंद्रीय …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या नादी लागण्याचा कोणी स्वप्नातही प्रयत्न करू नये… मुख्यमंत्री शिंदे सह बंडखोरांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार अस्तित्वात येऊन महिना उलटून गेला आहे. मात्र, अद्याप या दोघांव्यतिरिक्त एकाही मंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकरला लक्ष्य केलं असतानाच दुसरीकडे संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाने आपणच शिवसेना असल्याचा दावा करत पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं …

Read More »