Tag Archives: vinayak raut

सुनिल तटकरे यांचा टोला, कोकणात ठाकरे सेनेचं अस्तित्व काय, दुर्बिन घेऊन पहा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विनायक राऊतांना टोला

राष्ट्रवादीचे काँग्रेस (अप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे शिवसेनेवर बाळा माने प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. त्या ठिकाणी आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे वाटल्याचा आरोप करावा असा …

Read More »

विनायक राऊत यांची मागणी, एकनाथ शिंदे, उदय सामंत, निलेश राणे यांच्यावर कारवाई करा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी करण्याची केली मागणी

न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावून जाहिर कार्यक्रम, जाहिर सभा घेऊ नये घेता येत नसताना कुडाळ येथे रात्री १० नंतर जाहिर सभा घेतली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असून या अवमानप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत यांनी …

Read More »

नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावा याचिका अस्पष्ट आणि सदोष असल्याचा नाराय़ण राणेंचा अर्जातून दावा; लवकरच सुनावणीची शक्यता

शिवसेना उबाठा नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपा नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. परंतु, ती याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी मागणी कऱणारा अर्ज नारायण राणे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. आपल्याविरोधात केलेली निवडणूक याचिका सदोष असून त्यात …

Read More »

नारायण राणे यांचा निवडणूकीतील विजय भ्रष्ट मार्गाने, निवडणूक आयोगाला नोटीस लोकसभा निवडणूकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याची तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात घालण्यात यावी यासाठी कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला अ‍ॅड. असीम …

Read More »

अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर त्यांच्या विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेच्या खासदारांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यासाठीही आस्ते कदम ठेवले जात आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनाही अशाच पध्दतीने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहिर करण्यात आली. अगदी त्या पध्दतीने आणि …

Read More »

ठाकरे गटाची पत्राद्वारे थेट राष्ट्रपतींकडे मागणीः संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा पाच किंवा ६ तारखेची चर्चेसाठी वेळेची मागणी

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सर्वपक्षिय नेत्यांनी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रश्नी पुन्हा आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात सत्ता सहयोगी पक्षाच्या आमदारांच्या घरांच्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु …

Read More »

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांचा पलटवार,… एकनाथ शिंदेंना स्मृतीभ्रंश झाला एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाची कावीळ झालीय

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडताना म्हणाले, मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं …

Read More »

उदय सामंत यांची बैठकीनंतर माहिती, बारसू प्रकरणी उध्दव ठाकरे यांना ब्रिफींग हवे असेल तर…. उद्योग मंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्यात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे माती परिक्षण सुरू झाले. मात्र, हे माती परिक्षण सुरू होताच येथील ग्रामस्थांनी परिक्षणस्थळी आंदोलन पुकारले. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पांगविण्यासाठी महिला, मुलांसह सर्वांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे येथील परिस्थतीत तणाव निर्माण झाला. परंतु …

Read More »

विनायक राऊत यांचा हल्लाबोल, माळरानाच्या दगडाची अन् करवंदीच्या…. महिला आंदोलकांना हाकलून लावले

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कठोर विरोध केला. माती परिक्षणाकरता अधिकारी आले असता त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी ग्रामस्थांनी तेथे आंदोलन छेडले. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, या आंदोलकांना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी कोकणातील खासदार विनायक …

Read More »

फडणवीसांच्या त्या प्रश्नाला विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर, होय आम्ही घेतलीय सुपारी… हुकूमशाही पध्दतीने स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने हा विरोध मोडून काढला. तसेच ड्रिलिंगचं काम सुरू केलं. यावेळी पोलिसांनी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी आज बारसू गावाला भेट …

Read More »