मान्सूनचे मुंबईत ११ जूनला आगमन १८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहीलेले आहेत. लॉकडाऊन असला तरी आणि सततच्या तापमान वाढीमुळे नागरिकांना धड घरातही बसता येईना आणि बाहेरही जाता येईना. मात्र आता नागरिकांना दिलासादायक वृत्त असून यंदा मान्सूनचे ११ जूनला मुंबईत आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे असे आवाहन राज्य सरकारने शेतकऱ्यांना केले आहे.
११ जूनला जरी पावसाने मुंबईत आगमन झाले तरी तो संपूर्ण राज्यात १८ जून पर्यंत पोहोचणार आहे. तसेच २०२० चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के राहिल असा अंदाज असून अल-निनो सामान्य राहणार आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात एल निनो स्थिती राहिल असा अंदाज हवामान खात्याने राज्य सरकारला सादर केलेल्या आपल्या अहवालात नमूद केले.

About Editor

Check Also

२९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *