हवामान

हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज

मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …

Read More »

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. नॅशनल वेटलँड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून करावे. त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

पावसासाठी नव्हे तर या कारणासाठी पुढील २४ तासांकरिता या जिल्ह्यांना येलो अलर्ट अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ६५ – ११५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील …

Read More »

राज्यात पावसाचा जोर ओसरला पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवायेलो अलर्ट नाही

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसारराज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिताराज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) …

Read More »

हवामान खात्याने दिला इशाराः या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे सह विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश

महाराष्ट्राला आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुढच्या २४ तासांत राज्यातील महत्त्वाच्या शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. Active monsoon …

Read More »

पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तर रायगड, रत्नागिरीत पूर परिस्थिती

मागील पंधरा दिवसापासून जवळपास दडी मारलेल्या पावसाने काल पासून सक्रिय होत आज मुंबईसर राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांपासून पावसानं जोर पकडला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती पुढे येत असून पावसामुळं रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती …

Read More »

आजचा दिवस मान्सूनचाः २०० हून अधिक मिमी मान्सून बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बरसणार

आधीच राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सून पावसाने जूनच्या अखेरीस येऊनही जून महिन्यातील तूट भरून काढल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता जुलै महिना अर्धा संपला तरी अद्याप पावसाने अद्याप मुंबईसर राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढावले असण्याची …

Read More »

मान्सून आणखी दोन दिवसांनी मुंबईसह राज्यात जोरात बरसणार

केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाका जाणवायला लागला. 21/06: IMD's Rainfall distribution …

Read More »

अखेर मान्सून राज्यात धडकलाः वातावरणातल्या गारव्याने नागरिकांना दिलासा कोकणात बरसल्या मान्सूनच्या सरी

महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान …

Read More »

मान्सून केरळात, पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात सक्रिय बिपॉरजॉय चक्रीवादळाचा धोका सध्यातरी टळला

साधारणतः १ जून या सरासरी तारखेला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा ४ दिवस उशिराने म्हणजे ४ जून रोजी अपेक्षित होता. त्यातही कमी-अधिक ४ दिवसाचा फरक धरून तो केरळात १ जून ते ८ जून या ८ दिवसादरम्यान कधीही दाखल होऊ शकतो, असं भाकीत भारतीय हवामान खात्याकडून या वर्षी वर्तवण्यात आलं होतं. …

Read More »