पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

शेतकर्‍यांसाठी बंदोबस्त लावताय की चीन सीमेवर की पाकिस्तान सीमेवर बंदोबस्त लावताय अशी विचारणा करतानाच जनरल डायर नीतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

ही सगळी परिस्थिती निर्माण करुन दडपशाहीने आंदोलन संपवण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे, हे लोक स्वीकारणार नाही. ही डायर नीती बंद करावी असे त्यांनी केंद्र सरकारला ठणकावले.

चार – चार बॅरिकेटर, रोडवर खिळे टाकण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे अन्नपाणी बंद करायचे आणि अडचणीत येतील असा प्रयत्न होतोय ही लोकशाही पध्दत नाही तर मोदी वेगळ्या पध्दतीने चालवत आहे हे जनता कधीच स्वीकारणार नसल्याचे ते म्हणाले.

 

About Editor

Check Also

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’

बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *