मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे तर हेमंत नगराळे सुरक्षा मंडळाचे संचालक राज्य सरकारकडून बदलीचे आदेश जारी

फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार असलेले संजय पांडे यांनी आपला अहवाल दिल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्णवेळ पोलिस महासंचालक पदावर राजीव सेठ यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय पांडे यांनी सुट्टीवर जाण्याची तयारी सुरु केलेली असतानाच राज्य सरकारने आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. तर विद्यमान आयुक्त हेमंत नगराळे यांना राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली.

विशेष म्हणजे या दोन्ही अधिकाऱ्यांना मधल्या काळात दर्जा वाढवित त्यांना पोलिस महासंचालक पदाचा दर्जा राज्य सरकारकडून देण्यात आला.

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना केंद्राने पुन्हा प्रतिनियुक्तीवर नियुक्त केल्यामुळे महासंचालक पद रिक्त होते. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र त्यांची सेवा ज्येष्ठतेचा विषय निर्माण झाल्याने नगराळे यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. सुरुवातीला संजय पांडे यांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न पांडे यांच्या अंगलट आला. त्यामुळे या वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात फोन टॅपिंगचे प्रकरण उघडकीस आले. तसेच त्याबाबतचा अहवालही उघड झाला. त्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली.

त्या समितीचे प्रमुख आयपीएस अधिकारी आणि तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याच नेतृत्वाखाली होती. त्यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपासणी करून यात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दोषारोप ठेवला. त्यानुसार शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा नोंदविला. परंतु दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्याला पूर्णवेळ पोलिस महासंचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत महासंचालक पदी आयपीएस अधिकारी राजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यामुळे आयपीएस अधिकारी संजय पांडे हे नाराज झाल्याने ते सुट्टीवर जाण्याच्या विचारत होते. मात्र त्यांना आता मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. तर पांडे यांच्या सुरक्षा मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, ठाणे ‘मोबिलिटी हब’ तर कल्याण ‘प्रगत शहरी केंद्र’ म्हणून विकसित करणार एमएमआरडीच्या बैठकीत ४८ हजार कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी

मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *