स्पृहा जोशी बॉलिवूडमध्ये या अभिनेत्याबरोबर झळकणार स्पृहा जोशी लवकरच बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या सोशल मीडियामुळे देखील चर्चेत असते. स्पृहानं आजवर फक्त मराठी नाही तर हिंदीमध्ये देखील काम केलं आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील स्पृहा आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्पृहानं नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक माध्यामात तिची एक वेगळी प्रतिमा आहे. आता स्पृहानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

स्पृहाचा एक बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘सब मोह माया है’ असं आहे. स्पृहानं तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एक मिश्रा कुटुंब आहे. या कुटुंबातील वडिलांची भूमिका अभिनेता अन्नू कपूर साकारत आहेत तर मुलाची भूमिका हा अभिनेता शरमन जोशी साकारत आहे.

वडिलांकडे सरकारी नोकरी आहे. त्यांची इच्छा आबे की मुलाकडे देखील सरकारी नोकरी असायला हवी. पण या कुटुंबासमोर अनेक अडथळे निर्माण होतात. तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ते कसे उपाय करतात आणि त्यांच्या अडचणी कशा वाढतात. इतकंच नाही तर सरकारी नोकरी मिळावी म्हणून शरमन जोशी कशा प्रकारे वडिलांच्या निधनाचे नाटक करतो. त्याशिवाय वडील आणि मुलामध्ये असलेलं वेगळं नात आपल्याला यात पाहायला मिळत आहे.

About Marathi E Batmya

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *