शिवसैनिकांनो फक्त मतच नाहीतर मनही जिंकायचं शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी

आगामी निवडणूका कधीही लागू शकतात. त्यामुळे शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत घेवून जायची असल्याने फक्त जनतेची मतेच नाहीतर मनही जिंकायची अशी घोषणा राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी स्वबळावर निवडणूका लढायच आणि जिंकायचच असा निर्धार शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी केले.

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात गोरेगांव येथील नेस्को संकुलात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवून कामाला लागले पाहिजे असे आवाहन करत शिवसेनेला फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादीत न ठेवता देशभरात न्यायची असल्याची घोषणा करत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत शिवसेनेने जिद्दीने आणि चिकाटीने लागली तर काय होवू शकते हे सिनेट निवडणूकीत दाखवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *