हाच तुमचा नवीन भारत आहे का? मुस्लिमांसोबतच्या त्या व्हिडिओवर संताप

राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करत असून, त्यांना पोलीस लाथांनी मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मुस्लिमांच्या विनाशाची वेळ आता सुरू झाली आहे, हाच नवीन भारत आहे का? येणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि आरएसएस यांना लाथ घालून बाजूला करा, असे आवाहनही यावेळी केले.

२०१४ सालापासून केंद्रात भाजपाप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोधी करणाऱ्या मुस्लिम समाजासह इतर पुरोगामी संघटना, व्यक्तींच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई होत आहे. त्यातच २०१४ सालानंतर दिल्लीसह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आदी राज्यांमध्ये मुस्लिम समुदायांच्या विरोधात आता पोलिस प्रशासनाकडून साध्यासाध्या गोष्टींवरून मुस्लिम समुदायांना धमकाविण्याचे त्यांची प्रतारणा करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच दिल्लीतील एका रस्त्यावर नमाज पडणाऱ्या काही मुस्लिम धर्मियांना दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने चक्क लाथेने मारहाण करत त्यांना नमाज पडण्यास मनाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर संबधित पोलिसाला जाब विचारण्याचा प्रयत्न इतर मुस्लिम युवकांनी केला असता उलट त्या पोलिसांनेच युवकांवर खाकी वर्दीचा रूबाब दाखविण्याचा प्रयत्न केला.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *