जंतर मंतर येथे जुलैमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेली पाळत – ज्यात चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा (facial recognition technology) समावेश आहे – ही ‘नकारात्मक शासकीय हस्तक्षेप’ ठरते का, याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. हा प्रश्न विचारणाऱ्या याचिकेवर नोटीस बजावताना, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन …
Read More »आणखी एका वर्षाच्या शांतता बॉण्डवर स्वाक्षरी घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांची केली सुटका एसईएम न्यायालयाची कार्यवाही, कलम १२६ आणि १७० अंतर्गत शांतता भंग केल्याप्रकरणी केली कारवाई
कॉकरोच जनता पक्षाचे -सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांना शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानाजवळ ताब्यात घेण्यात आले होते. कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सशर्त जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. १० ऑक्टोबर रोजी त्यांनी सादर केलेल्या शांतता …
Read More »अभिजीत दीपके यांच्यानंतर आयसाच्या अध्यक्ष नेहा बोरा यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात मंडी हाऊस येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा
सीजेपी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर, बाराखंबा रोडवर डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, कनॉट प्लेस परिसरातही काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीजेपीच्या (CJP) निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, हातात तिरंगा घेतलेल्या लोकांचा एक गट कनॉट प्लेसच्या इनर सर्कलमध्ये पोहोचला आहे. दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) …
Read More »सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यास दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी दीपके यांना घेऊन जाणाऱ्या वाहनास रोखून धरले
दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त आणि जनसंपर्क अधिकारी (PRO) राजीव रंजन यांनी सांगितले की, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, विशिष्ट व्यक्तींच्या यादीबाबत पोलिसांना कोणतीही सूचना किंवा विनंती प्राप्त झालेली नाही. राजीव रंजन यांनी स्पष्ट केले की, ‘ध्वज संहिता’ (Flag Code) अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आली असून, त्यानुसार राष्ट्रीय ध्वज …
Read More »दिल्ली पोलिसांची विनंती, २७३ कंपन्यांची तैनाती २० ऑक्टोबरपर्यंत वाढवा पत्राद्वारे गृह विभागाला केली विनंती
दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला विनंती केली आहे की, सध्या राजधानीत तैनात असलेल्या ‘सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस’च्या (CAPF) ३०१ कंपन्यांपैकी २७३ कंपन्यांची तैनाती २० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात यावी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांचे कार्यकर्ते जंतर-मंतर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, कायद्याशिवाय कोणालाही स्थानबद्धता नाही, वाहतूक-मेट्रो बंदी नाही अवमान याचिकेप्रकरणी कारवाई का नको, स्पष्टीकरण देण्याचे आदेश
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर रोजी मेट्रो स्थानके बंद ठेवल्याबद्दल आपल्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रविवारी दिल्लीतील संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेविरोधात जंतर-मंतर येथे झालेल्या निदर्शनांमुळे …
Read More »विमानातच पोलिस आल्यानंतर अभिजीत दीपके म्हणाले, आम्ही अटक करवून घेण्यासाठीच आलो आहोत.. मुंबईहून दिल्लीत विमान उतरल्यानंतर अटकेसाठी आलेल्या पोलिसांना सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले
व्यावसायिक विमान प्रवासात क्वचितच पाहायला मिळणाऱ्या एका घटनेत, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांना दिल्लीत विमान उतरल्यानंतर लगेचच विमानाच्या आतून ताब्यात घेण्यात आले. शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात नियोजित असलेल्या आंदोलनापूर्वी ही कारवाई करण्यात आली. मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानात, प्रामुख्याने …
Read More »घाबरलेल्या दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या अभिजीत दीपके, रांका, दास यांना विमानातूनच केली अटक मुंबईहून एअर इंडिया विमानाने दिल्लीला पोहोचताच दिल्ली पोलिसांची कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निवडणूक आयोगाच्या संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेताना एसआयआर वेळी फॉर्म ६ मध्ये न्यायालयाच्या संमतीशिवायच सुधारणा केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही केंद्र सरकारने योग्य तो निर्णय न घेताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावर कायम ठेवले. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने १० ऑक्टोंबर रोजी आंदोलनाचा नारा सीजेपीने …
Read More »काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचा आरोप, माझ्याकडील सर्व गोष्टी पोलिसांनी खेचून घेतल्या पोलिसांनी जबरदस्तीने केली अटक
बुधवारी मध्य दिल्लीत मोठा तणाव निर्माण झाला. ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे विरोधी पक्षनेते आणि खासदार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यासाठी जंतरमंतरकडे जात असताना, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून त्यांना अडवले आणि अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांना ताब्यात घेऊन आंदोलनस्थळावरून नेण्यात आले, तर प्रियंका गांधी वाड्रा …
Read More »मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटकही केली नसल्याची बडाई मारणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजला अखेर अटक पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भारद्वाजला पोलिसांनी केली अटक
जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान एका विद्यार्थी आंदोलकाच्या वडिलांचे डोके फोडले, त्यांना साठ टाके पडल्याचा धाडसी दावा एका कार्यकर्त्यांने केला. तसेच केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. तर भाजपमधील नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या मोठ्या भावासारखे असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला. या वक्तव्यानंतर विरोधी …
Read More »
Marathi e-Batmya