कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची “गॅरंटी” काय?

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची “गॅरंटी” काय? असाही सवाल केला.

जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणुका आल्या की पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे. हे आता नित्याचेच झाले आहे. वाढलेले ४० रुपये व कमी केलेले २ रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्टच दिसते. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची “गॅरंटी” काय?

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *