Tag Archives: केंद्र सरकार

E100 इथेनॉल इंधनाला सरकारची मंजुरी; १००% इथेनॉलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांचा मार्ग मोकळा 'फ्लेक्स-फ्यूल' (flex-fuel) वाहनांना प्रोत्साहन

सरकारने ‘सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स’ (केंद्रीय मोटार वाहन नियम) मध्ये सुधारणा करून, जवळजवळ १०० टक्के इथेनॉल असलेल्या ‘E100’ इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी अधिकृतपणे मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयाचा उद्देश ‘फ्लेक्स-फ्यूल’ (flex-fuel) वाहनांना प्रोत्साहन देणे, आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे आणि उत्सर्जनात (emissions) कपात करणे हा आहे. रस्ते वाहतूक आणि …

Read More »

फारुख अब्दुल्ला यांचा आरोप, पाकिस्तान काश्मीरचे रक्षण करतेय तर केंद्र सरकार दुर्लक्ष करतेय भाजपाच्या वक्तव्यांचा केला निषेध

नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी एका मोठ्या वादाला तोंड फोडले. त्यांनी असा दावा केला की, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून जम्मू-काश्मीरच्या जनतेचे रक्षण करत आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून गप्प बसले आहे. भाजपच्या वतीने फारुख अब्दुल्ला यांच्या विधानांचा तीव्र निषेध …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, कायद्याशिवाय कोणालाही स्थानबद्धता नाही, वाहतूक-मेट्रो बंदी नाही अवमान याचिकेप्रकरणी कारवाई का नको, स्पष्टीकरण देण्याचे आदेश

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर रोजी मेट्रो स्थानके बंद ठेवल्याबद्दल आपल्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रविवारी दिल्लीतील संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेविरोधात जंतर-मंतर येथे झालेल्या निदर्शनांमुळे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयास ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील याचिकेवर केंद्राच्या उत्तराची आशा मतदान चोरी-नावे काढून टाकण्याप्रकरणी एसआयटी तपास

‘इंडियन एक्सप्रेस’च्या एका अलीकडील वृत्तानुसार, निवडणूक आयोगाच्या (ECI) तीनपैकी दोन आयुक्तांनी विरोध दर्शवूनही आयोगाने मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेबाबत अनेक निर्णय घेतले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि ज्ञानेश …

Read More »

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रातील रबी हंगामासाठी केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी ५०० कोटींचा निधी; १० लाख रबी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणी

महाराष्ट्रातील विविध भागांत यंदा कमी व असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रबी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली. राष्ट्रीय कृषि संमेलन –रब्बी अभियान २०२६ च्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

सीजेपीचा केंद्र सरकारला इशारा, विद्यार्थ्यांचा विश्वासघात करू नका दिलेला शब्द पाळा दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांची सरकारने अद्याप माहिती दिली नाही

कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी- २५ जुलै रोजी आपले देशव्यापी आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनांवर केंद्राने दिलेल्या प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक घेणार आहे. कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी पक्षाने म्हटले आहे की, ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे सरकारने अद्याप औपचारिकपणे कळवलेले नाही. …

Read More »

युपीआय UPI वापर नागरिकांसाठी फ्रि मात्र काही व्यापाऱ्यांना शुल्क भरावे लागण्याची शक्यता अर्थ मंत्रालयाची माहिती, एमडीआऱ शुस्क लागू करणार

भारत सरकारने शनिवारी सांगितले की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआय (UPI) द्वारे पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांना कोणतेही व्यवहार शुल्क भरावे लागणार नाही, तर भविष्यात मर्यादित व्यापारी व्यवहारांसाठी नाममात्र मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात एमडीआर (MDR) लागू केला जाऊ शकतो. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) युपीआय UPI व्यवहार पूर्णपणे विनामूल्य राहतील. तसेच, …

Read More »

Gen Z च्या आंदोलनामुळे केंद्राने अंहकार सोडत दोन विधेयकांसाठी विरोधकांसमोर नरमाईची भूमिका संसदीय मंत्री किरण रिजिजू यांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा

जवळपास तीन आठवड्यांपासून संसद ठप्प आहे. नीट पेपरफुटीविरोधात जनरेशन-झेडचे आंदोलन, नवी दिल्लीत आंदोलकांवर पोलीस आणि निमलष्करी दलांनी केलेली कारवाई, आणि अयोध्येतील राम मंदिरात झालेली कथित देणगी चोरी, यांमुळे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील सर्व चर्चा ठप्प झाल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यांवर बोलावे, अशी मागणी करत विरोधी पक्ष कामकाजात …

Read More »

महाराष्ट्राला मिळाला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त कर निधी केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरीत केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, केंद्राकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३३५ कोटींची मोठी भेट राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ३३५ कोटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीस मंजुरी दिली असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. …

Read More »