वंचित बहुजन आघाडीचा खुलासा, सहा जागा मागितल्याची बातमी खोटी

वंचित बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात. त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. आज काही चॅनल्सने वंचित बहुजन आघाडीने सहा जागांचा प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी चालवली. या बातमीमध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासा वंचित बहुजन आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये केला.

आम्हाला महाविकास आघाडीकडून अकोला आणि इतर दोन अशा एकूण तीन जागांचा प्रस्ताव आलेला होता, तो आम्ही नाकारलेला आहे. त्यानंतर या पद्धतीच्या पाच आणि सहा जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या बेसलेस आहेत. त्यात कुठलाही तथ्य नाही. माध्यमांना आमची विनंती आहे, आम्हाला फोन करा एकदा कन्फर्म करा आमच्याबद्दल बातमी देताना आणि मगच बातमी द्या. वंचित बहुजनांचं हे जे राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत, त्यात कृपया अशा खोट्या बातम्या देऊन आडकाठी आणू नका असे आवाहनही केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एसआयआर (SIR) रद्द करा, निवडणूक आयोगावर जनतेचा अविश्वास नवयुवकांचा नाव नोंदणीस थंड प्रतिसाद, असंतोष पाहता पुन्हा नव्याने अर्ज- ६ भरण्याची मुभा देण्यात आली

निवडणूक आयोगाने सुरु केलेली एसआयआर मोहिम सुरुवातीपासूनच अत्यंत गुंतागुंतीची व वेळकाढूपणाची ठरली आहे. आयोगाच्या कामाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *