राजस्थानात नरेंद्र मोदींचे हेट स्पीच; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे १७ तक्रारी मुस्लिम देशातील घुसखोर, हिंदूची मालमत्तेचे पुन्हा वाटप करण्याचा प्रयत्न

देशातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच शिगेला पोहोचत आहे. यापूर्वी केंद्रिय निवडणूक आयोगाने लेव्हल प्लेइंग फिल्डचा घोषणा करत काँग्रेस आणि त्यांच्या प्रचारावर बारकाईने लक्ष्य ठेवण्यास सुरुवात केली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बनसाडा येथील प्रचार सभेत बोलताना काँग्रेसवर त्यांच्या मुस्लिमांविषयीच्या धोरणावर टीका करत प्रचारासभेत मुस्लिम विरोधी वक्तव्य केले. नरेंद्र मोदी यांच्या त्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तब्बल १६ तक्रारी दाखल केल्या. तसेच अलीगड येथील जाहिर सभेत बोलतानाही नरेंद्र मोदी यांनी त्याच गोष्टीचा वापर केला.

राजस्थानातील जाहिरसभेत नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, काँग्रेसचे आधीचे पंतप्रधानांनी मुस्लिमांना हिंदू समाजाची मालमत्ता काढून घेऊन त्यांच्यात वाटप करण्याची घोषणा केली. तसेच देशातील मुस्लिम समाज हा घुसखोरी केलेला असल्याचे वक्तव्य केले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचा नेहमीच काँग्रेसने विरोध केला. तर दुसऱ्याबाजूला भाजपाने मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार काम करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात सांगितले आहे की, प्रत्येकाच्या मालमत्तेचा सर्व्हे केला जाईल, कोणाकडे किती जणांकडे सोने आहे, पैसा आहे त्यातील अतिरिक्त संपत्ती जमा करून घेऊन त्याचे पुर्नवाटप करणार असल्याचे सांगितले, तसेच महिलांच्या गळ्याती सोन्याचे मंगळसूत्र काढून घेणार आणि ही सगळी संपत्ती कोणाला वाटणार तर ज्यांची सर्वाधिक मुले आहेत त्यांच्यामध्ये वाटप करणार, त्या घुसखोरांना वाटणार हे सगळं काँग्रेसच्या जाहिरनाम्यात स्पष्टपणे लिहिलय.

या हेट स्पीचच्या विरोधात काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एकूण १६ तक्रारी दाखल केल्या आहेत. यासंदर्भात अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरसरळ मुस्लिम धर्मियांच्या विरोधात बोलत आहेत. यातून ते मतांचे पोलरायझेशन करत आहेत असा आरोपही यावेळी केला.

काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतरही नरेंद्र मोदी यांनी अलीगड येथील जाहिर सभेत बोलताना याच वाक्याचा पुर्नरुच्चार केला. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप त्यावर प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *