एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला.

पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ या काळात. त्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी होते. मात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करीत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर फोडत आहे. त्यांना का करत राहू द्या, आम्ही राजनैतिक मार्गाने आमचे काम करत राहू, असेही सांगितले.

मुंबईतील भाजपा आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉ. एस. जयशंकर यांनी बीकेसी येथील ‘एनएसई’ मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. एस. जयशंकर म्हणाले, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेत. या कालावधीत पायाभूत सुविधा किती प्रमाणात वाढल्या आणि किती प्रगती झाली, ते मतदार अनुभवतो आहे. मोफत आरोग्य उपचार, घर, मुद्रा कर्ज, आणि स्वनिधी यात मोठी वाढ होणार आहे. मोदींच्या काम करण्याच्या आणि आश्वासने पूर्ण करण्याच्या हमीवर भाजपा मतदारांचे आशीर्वाद मागत आहे.

तसेच एस जयशंकर पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याची बाजू मांडायचे काम कोणी केले, कोणती विचारधारा दहशतवाद्यांविरोधात लढतेय, याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. भाजपाच्या दहशतवादविरोधी धोरणामुळेच आज दहशतवादी कारवायांना आळा बसला असल्याचा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, भाजपा सरकारने कलम ३७० हटवण्याचे काम केले. परिणामी काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. एक दिवस तोही भारताशी जोडला जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

शेवटी बोलताना एस जयशंकर म्हणाले की, आजमितीस देशात दररोज २८ किमी लांब महामार्ग आणि १४ किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. जनता त्याचा नक्कीच विचार करेल, असेही सांगितले.

About Editor

Check Also

महाराष्ट्रात धार्मिक स्वातंत्र्य विधेयक कायदा विधानसभेत सादर प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद ० धार्मिक धर्मांतराच्या ६० दिवस आधी लेखी सूचना आवश्यक

महाराष्ट्रात जबरदस्तीने धर्मांतर आणि तथाकथित “लव्ह जिहाद” रोखण्याच्या उद्देशाने, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शुक्रवारी विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *