ठाण्यात बोगस मतदान, चुक लक्षात आणून देताच मतपत्रिकेद्वारे मतदान करवून घेतले

२५- ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८-ठाणे विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २७३ मध्ये एक मतदार मतदान करणेसाठी गेला असता, त्यांचे ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचे मतदान केंद्र क्रमांक २७३ चे मतदान केंद्राध्यक्ष यांचे निदर्शनास आले. त्यानंतर मतदार यांचे ओळखीची खात्री करुन मतदाराला भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार व निवडणूक निर्णय अधिकारी हस्तपुस्तिकेतील निर्देशानुसार प्रदत्त मतपत्रिका (Tender Ballot Paper) देवून सदर मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला.

एका मतदाराच्या नावे जर दुसऱ्या व्यक्तीने मतदान केले असेल तर मूळ मतदाराच्या ओळखीची खात्री पटवून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सदर मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देवून त्यास मतदान करण्याची तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातंर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्रमांक २७३ वर झालेल्या प्रकारानंतर ओळखीची खात्री पटविल्यानंतर मूळ मतदाराने प्रदत्त मतपत्रिका भरुन मतदानाचा अधिकार बजावला आहे, असे २५ ठाणे मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी कळविले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नुकतेच शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर पत्रकार परिषदेत महायुतीतील काही राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांना ज्या भागातून मतदान मिळणार नाही अशा मतदारांच्या बोटाला मतदानाच्या आधीच शाई लावण्यात येत आहे. तसेच त्या व्यक्तीच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीकडून बोगस मतदान करण्यात येत असल्याचा आरोप करत या संदर्भातील तक्रार आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे सांगितले होते. त्यास काही दिवसांचा अवधी उलटून जात नाही. तोच ठाणे लोकसभा मतदारसंघात काहीसा असाच प्रकार घडल्याने तो बोगस मतदान करणार व्यक्ती कोणत्या पक्षाचा असा प्रश्न निर्माण होत आहे.

About Editor

Check Also

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई

मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *