शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे यांच्यासोबतही दुजाभाव केला असून शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री म्हणून शपथ दिली. त्यामुळे भाजपाच्या या वागणूकीमुळे राज्यात मात्र अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

शिंदे गटाला भाजपाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचे मान्य केल्यानंतर एक कॅबिनेट मंत्री पद आणि दोन राज्य मंत्री पद मागितली होती. मात्र मंत्रि पदाच्या शपथविधी सोहळ्यात प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री म्हणून शपथ दिली. त्यामुळे शिंदे गटाला मोठ्या अपेक्षेने जवळ घेणाऱ्या भाजपाने राज्यमंत्री पद देऊन एकप्रकारे बोळवण केल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

About Editor

Check Also

रोहित पवार यांचा आरोप, भाजप सरकार आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटतायत सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे

सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडे देखील आला आहे. भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *