जीतनराम मांझी एकमेव खासदार तरी केंद्रीय मंत्रिमंडळात, अजित पवार? भाजपाकडून अजित पवार यांच्यासोबत दुजाभाव

बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूस्थान अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडे दोन जागा जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाच्या दोन जागांपैकी एका जागेवर स्वतः जीतनराम मांझी हे स्वतः निवडूण आले. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोकसभा निवडणूकीत एकच जागेवर निवडूण आले तरी अजित पवार यांच्या खासदाराला कॅबिनेट मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलेले नसल्याने भाजपाचा दुजाभाव दिसून आला आहे.

जीतनराम मांझी हे नितीश कुमार यांच्या पक्षात होते. कालांतराने नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सोपविली. मात्र मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर नितीन कुमार आणि जीतनराम मांझी यांच्यात बेबनाव झाला. त्यानंतर जीतनराम मांझी यांनी हिंदूस्तान अवामी मोर्चाची स्थापना करत स्वतंत्र सवता सुभा मांडला. परंतु पुन्हा नितीश कुमार यांच्याबरोबरील राजकिय आघाडीत सहभागी झाले. ते आजपर्यंत नितीश कुमार यांच्यासोबतच आहेत.

परंतु महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राजकिय ताकदीला आव्हान देत अजित पवार यांनी स्वतंत्र भूमिका घेतली. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदार त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सहभागीही झाले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, नमन, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी लोककलांचाही अनुदान योजनेत समावेश · दशावतारासह लोककला अनुदान दुप्पट; कलाकारांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होणार

विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *