Tag Archives: राज्यमंत्री

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती, टीईटीबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक शिक्षकांना एआयचे मोफत प्रशिक्षण

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही सेवामूल्यमापनासाठी नसून मूलभूत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आहे. टीईटी संदर्भात सदस्यांनी मांडलेल्या सर्व  सूचनांची शासनाने नोंद घेतली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. तसेच राज्यातील सर्व शिक्षकांना गुगल एज्युकेशनच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल, अशी  माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज …

Read More »

डॉ पंकज भोयर यांची माहिती, ग्रामीण व दुर्गम भागातील माध्यमिक शाळांमध्ये २० विद्यार्थ्यांवर तीन शिक्षक अनुज्ञेय विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

ग्रामीण व दुर्गम भागातील इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी शासनाने शिक्षक अनुज्ञेयतेबाबत मोठा निर्णय घेतला असून, २०२५-२६ या संचमान्यता वर्षासाठी दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास तीन शिक्षक अनुज्ञेय करण्याची सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य किरण …

Read More »

डॉ पंकज भोयर यांचे निर्देश, कारागृह पुनर्विकास आणि आधुनिकीकरण प्रकल्पांना गती द्या कारागृह विकास प्रकल्पांमुळे बंदी क्षमता व सुविधा वाढणार

राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ मे २०२६ रोजी आयोजित कारागृहाबाबत आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अनुपालनाबाबत मंत्रालयात राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार …

Read More »

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा …

Read More »

मंत्रालयाला लागून नव्या इमारतीत, बाहेरचे विभाग आणि राज्यमंत्र्यांना मिळाली जागा आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग एकाच इमारतीत, प्रशासकीय कामकाज अधिक सुटसुटीत होणार

महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना आणि विभागांना मंत्रालयाच्या मुख्य आणि अनेक्स इमारतीत जागा कमी पडत असल्याने गार्डन गेटजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या एनेक्सी-२ (विस्तारीत-२) इमारत उभारण्यात आली. या इमारतीत जीटी हॉस्पीटल आणि सीएसटी भागात असलेल्या विविध विभागांना आणि मंत्र्यांच्या कार्यालयाना पुन्हा मंत्रालयात आणण्यात आले असून यातील दालने दोन कॅबिनेट, पाच राज्यमंत्री आणि मंत्रालयाच्या …

Read More »

आशिष जयस्वाल यांची माहिती, पारंपरिक पुजाऱ्यांसाठी राज्यस्तरीय सर्वसमावेशक धोरण लवकरच पुजाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी शासनाचे सकारात्मक पाऊल

राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्क व संरक्षणासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यांच्या सन्मान व उपजीविकेची हमी देणारे सर्वसमावेशक राज्यस्तरीय धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस धर्मादाय आयुक्त एस. एस. कलोती, विधी व न्याय …

Read More »

डॉ पंकज भोयर यांची माहिती, दक्षिण मुंबईतील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती दक्षिण मुंबईतील कामाठीपुरामधील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याबाबत राज्य शासन कटिबद्ध असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली. विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले की, कामाठीपुरा परिसरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह …

Read More »

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित …

Read More »

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील “आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर” पुरस्कार

राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील U.S. India SME Council, Washington DC तर्फे “Outstanding Visionary Leader & True Changemaker” हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार १४ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून त्यांचा सत्कार २५ …

Read More »

डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन

मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, २००८ साली स्थानिक रहिवाशांनी हा …

Read More »